Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

डेटिंग ॲपच्या नावानं समलैंगिकांना गंडा; धमकी देत तरूणाकडून पैसे लुटले

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ऍपवर मैत्री करून तरुणांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. दौलताबाद पोलिसांनी ही कारवाई करत तिघांच्या मुसक्या आवळल्यात. तरूणांना एकांतात गाठत, तुझे व्हिडीओ व्हायरल करतो अशी धमकी देत ही टोळी गंडा घालायची आहे.

डेटिंग ॲपच्या नावानं समलैंगिकांना गंडा; धमकी देत तरूणाकडून पैसे लुटले

नितेश महाजन,झी-मीडिया, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ऍपवर मैत्री करून तरुणांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. दौलताबाद पोलिसांनी ही कारवाई करत तिघांच्या मुसक्या आवळल्यात. तरूणांना एकांतात गाठत, तुझे व्हिडीओ व्हायरल करतो अशी धमकी देत ही टोळी गंडा घालायची आहे.

आरोपी नंबर 1- 23 वर्षीय शिवम पवार
आरोपी नंबर 2- 21 वर्षीय आयुष लाठे आणि 
आरोपी क्रमांक 3- 21 वर्षीय राहुल खांडेकर 
या तीन तरूणांनी गेल्या नऊ महिन्यांत 10 पेक्षा अधिक समलैंगिक तरुणांना लुटलं आहे. 

ऐन शिक्षण घेण्याच्या वयात या तिन्हीही महाभागांनी केलेला प्रताप ऐकाल तर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. शिवम,आयुष आणि राहुल या तिघांनीही समलैंगिक डेटिंग अँप असलेल्या वल्लावर स्वतःची बनावट प्रोफाईल तयार करत तरूणांना गंडा घातलाय.

डेटिंग ॲपच्या नावानं समलैंगिकांना गंडा घातला आहे. आरोपींनी वल्ला डेटिंग ऍपवर बनावट प्रोफाईल तयार केले आहे. या आरोपींनी बनावट प्रोफाईलवरून एका समलैंगिक तरुणाला भेटण्यासाठी निर्जळ स्थळी बोलावलं. दोघांमध्ये गप्पा सुरु असताना इतर दोन आरोपी तिथे आले आणि तिघांनी मिळून तरूणाला बेदम मारहाण केली. मारहाणीची दृष्य मोबाईलमध्ये चित्रीत केली एवढंच नव्हे समलैंगिक असल्याचे व्हिडिओ व्हायरल करण्यची धमकी दिली आहे. धमकी देत तरूणाकडून पैसे लुटले

दरम्यान यातील पिडीत तरुणाने हिम्मत करत पोलिसांकडे तक्रार केली.या तक्रारीवरून पोलिसांनी या तीन आरोपींच्या मुसक्या आवळत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. 

पोलिसांनी पकडलेल्या तिघांनी केवळ दौलताबादच्याच तरुणाला नाही तर अनेकांना गंडा घातल्याची शक्यताय. आतापर्यंत या महाभागांनी गंडा घातलेले 4 तक्रारदार पुढे आलेत.गेल्या 9 महिन्यात या टोळीने 10 जणांना लुबाडल्याची माहिती समोर आलीय.आणखी काही गुन्हे या आरोपींकडून उघडकीस येण्याची शक्यता आहेत. 

पोलिसांनी पकडलेल्या आरोपींपैकी राहुल बीएस्सी तर आयुष आणि शिवम हे दोघं नर्सिंगचे विद्यार्थी आहेत.ऐन शिकण्याच्या वयात या तरुणांनी समलैंगिक तरूणांना लुबाडण्याचं सत्र सुरू केलं...आता तिन्ही आरोपींना पकडण्यात आलंय...समलैंगिक असलेल्या तरूणांना या तिन्ही आरोपींनी लुटलं आहे. हा अतिशय गंभीर प्रकार आहे...आता अटकेतल्या तरूणांकडून तपासात अजून काय समोर येतंय, ते पाहावं लागेल.

Read More