Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गाव वस्तीवर रस्ताच नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; कोल्हापुरातील विचित्र प्रकार

कोल्हापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना. ग्रामपंचायतच्या हद्दीत असणाऱ्या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ. 

गाव वस्तीवर रस्ताच नसल्याने आजीला बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ; कोल्हापुरातील विचित्र प्रकार

Kolhapur Badyachiwadi Road Issue : कोल्हापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी या गावात ग्रामपंचायतच्या हद्दीत असणार्‍या वस्तीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने एका आजीला चक्क बैलगाडीतून रुग्णालयात नेण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे या गावातील ग्रामपंचायतच्या कामावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांनी सांगून देखील रस्ता होत नसल्याचा आरोप केला आहे. अशातच अचानक आजीची तब्येत बिघडल्यामुळे त्या ठिकाणी कोणतेही वाहन येऊ शकत नसल्याने नागरिकांना आजीला बैलगाडीमधून रुग्णालयात घेऊन जावे लागले.

सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियाव मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. रस्ता नसल्यामुळे आजीला रुग्णालयात बैलगाडीतून नेण्याची वेळ आल्यामुळे त्या वस्तीवर नागरिक देखील संतापले आहेत. संतापलेल्या आजीच्या नातवाने मंत्री हसन मुश्रीफ यांना संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. तसेच त्यांना फोन करून रस्ता करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे. 

वारंवार रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष 

कागल विधानसभा मतदारसंघातील गडहिंग्लज तालुक्यातील बड्याचीवाडी इथे अनेक वर्षांपासून रस्त्यांसाठी संघर्ष सुरू आहे. या गावाजवळ 15 ते 20 घरं आहेत.  40 ते 50 मतदार असलेल्या या गावातील वस्तीवर जाण्यासाठी रस्ता करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून तेथील नागरिकांनी केली आहे. मात्र, वारंवार मागणी करून देखील हा रस्ता होत नसल्याने या विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. पण निवडणुकीच्या तोंडावर प्रशासनाने याची दखल घेत हा रस्ता आम्ही पूर्ण करून देऊ अशी ग्वाही ग्रामस्थांना दिली होती. मात्र, निवडणूक संपतात सोयीस्कररित्या जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी केलेल्या मागणीकडे दुर्लक्ष केले. 

आज देखील बड्याचीवाडी येथील नागरिक हे रस्त्यापासून वंचित आहेत. अशातच त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे आहे तो रस्ता देखील प्रचंड खराब झाला आहे. अशातच त्या वस्तीवरील एका आजीची तब्येत बिघडली असून तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास रस्ता नसल्यामुळे अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे बैलगाडीतून  चिखलातून आजीला रुग्णालयात  न्यावे लागले. 

Read More