Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लग्न कधी करणार? मंत्री आदिती तटकरे यांचे दिलखुलास उत्तर

To The Point With Kamlesh Sutar : लग्नाच्या विषयाबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी दिलखुलास उत्तर दिले. 

लग्न कधी करणार? मंत्री आदिती तटकरे यांचे दिलखुलास उत्तर

Aditi Tatkare  : महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे या तरुण राजकारणी आहेत. युवा पिढीचं त्या नेतृत्व करतात. राजकीय आयुष्य जगत असताना त्यांच एक खाजगी आयुष्य देखील आहे. इतर घरात जसं घरची मंडळी लग्नाचा विषय काढतात आणि चर्चा करतात तशीच चर्चा आदिती तटकरे यांच्या घरी देखील होते.  लग्न कधी करणार?  हाच प्रश्न आदिती तटकरे यांना 'टू द पॉईंट'या कार्यक्रमात विचारण्यात आला. आदिती तटकरे यांनी या प्रश्नाचे दिलखुलास उत्तर दिले. 

राज्यात सत्तापालट झाले तेव्हा काही वेळ घरी गेले होते. यावेळी आजीने धीर दिला. आयुष्यात चढ उतार येत असतात खचून जायचं नसतं असं म्हणत धीर दिला. यावेळी आजीने लग्नाचा विषय काढला. घरुन नेहमीच लग्नाचा विषय काढला जातो असं आदिती तटकरे यांनी सांगितले.  नशिब ठरवतं आपल्या आयुष्यात काय होणार? कोण येणार? योग्य वेळी योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यावर बघू... असं दिलखुलास उत्तर आदिती तटकरे यांनी दिले.    

2014 पर्यंत सोशल मिडियाचा इतका प्रभाव नव्हता. मात्र, आता सर्वच जण सोशल मिडियावर एक्टीव्ह असतात. सोशल मिडियावर अपडेट रहाव लागतं असं आदिती तटकरे म्हणाल्या. 

 

Read More