Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

लग्नाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात, तुमची 'दिशा' चुकली

आदित्य ठाकरे आईच्या पसंतींच्या मुलीशी लग्न करणार का? 

लग्नाच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणतात, तुमची 'दिशा' चुकली

संगमनेर : पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. पर्यटन मंत्री झाल्यावर मुंबईच्या 'नाईट लाईफ'बद्दल आदित्य ठाकरेंनी महत्वाचा निर्णय घेतला. त्याचबरोबर आणखी एका गोष्टीमुळे आदित्य ठाकरे चर्चेत आहेत. ते म्हणजे त्यांच्या लग्नाच्या मुद्यावरून. त्यावेळी त्यांनी दिलेली ही दिलखुलास उत्तर.... 

संगमनेरच्या 'मेधा महोत्सव 2020' मध्ये अवधुत गुप्ते यांनी, 'रश्मी वहिनींनी किती वर्ष जबाबदारी घ्यायची'? आप कुछ भी बोलो हमे आपका उत्तर 'पटनी' चाहिए? असे दोन प्रश्न विचारले. यावेळी श्रोतुवर्गाकडून एकच कल्ला झाला. या प्रश्नाचं उत्तर देताना कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलखुलासपणे, तुमची 'दिशा' चुकलेली आहे. असं म्हणतं हा विषय तिथेच थांबवला.

तसेच या कार्यक्रमात पुढे आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला की,'लग्न आईच्या पसंतीच्या मुलीशी करणार की स्वतःच्या पसंतीच्या मुलीशी'. यावर उत्तर देणं देखील आदित्य ठाकरेंनी टाळलं. यावेळी 'जवळचं कोण? बाबा की आई', असा प्रश्न विचारून त्यांना गोंधळात टाकण्याचे प्रश्न विचारण्यात आले. यासारखे अनेक प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. (फेसबुक पोस्ट लिहून 'नाईट लाईफ'च्या निर्णयाचं रोहित पवारांकडून कौतुक) 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे 'मेधा महोत्सव 2020' भरवण्यात आला. या महोत्सवात 'संवाद तरूणाई' कार्यक्रमाचं खास आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी व्यासपीठावर धीरज देशमुख, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील, आणि रोहित पवार असे तरूण आमदार यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन संगीतकार, दिग्दर्शक अवधुत गुप्ते यांनी केलं होतं.

Read More