Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक ! रायगडच्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या जिवाशी खेळ

 समुद्र किनाऱ्यांवर बिनबोभाट विनापरवाना एटीव्ही राईड्स 

धक्कादायक ! रायगडच्या किनाऱ्यावर पर्यटकांच्या जिवाशी खेळ

रायगड : रायगड जिल्ह्यात किनाऱ्यांवर पर्यटकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. समुद्र किनाऱ्यांवर बिनबोभाट विनापरवाना एटीव्ही राईड्स चालवल्या जातायत. अलिबाग, नागाव, काशीद, दिवेआगर, मुरूड, किहीम, आवास इथल्या किनाऱ्यांवर या विनापरवाना एटीव्ही राईड्स सुरू आहेत. 

शनिवारी संध्याकाळी अलिबागच्या किनाऱ्यावर एटीव्ही उलटून २ महिला जखमी झाल्या होत्या. हे प्रकरण दाबण्यात आलं. पूर्वी याच्या परवानगीचे अधिकार हे मेरिटाईम बोर्डाकडे होते. 

मात्र सरकारने हे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी नसताना एटीव्ही बिनबोभाट सुरू आहेत. बेदरकारपणे या एटीव्ही किनाऱ्यांवर चालवल्या जातायत. 

गाड्यांच्या कर्णकर्कश हॉर्नमुळे अन्य पर्यटकांचा त्रास होतोय. मात्र कोणतीही परवानगी नसल्यामुळे कोणत्याही निर्बंधांशिवाय, नियमावली शिवाय हा व्यवसाय केला जातोय. हा पर्यटकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

Read More