Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

गडकरींच्या दौऱ्यादिवशी पेणमध्ये वाहतूककोंडी

पेण ते वडखळ दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून येतंय.

गडकरींच्या दौऱ्यादिवशी पेणमध्ये वाहतूककोंडी

मुंबई : मुंबई- गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे.कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहतूककोंडी ५ ते ६ किलोमीटरच्या भल्यामोठ्या या रांगा लागल्या आहेत.  पेण ते वडखळ दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाल्याचे दिसून येतंय.

गडकरी दौऱ्यावर

केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पेण दौऱ्यावर आहेत. याच दिवसाची सुरूवात वाहतूककोंडीने झाली आहे. नितिन गडकरी शाळेच्या उद्घाटनासाठी आज पेणमध्ये पोहोचत आहेत. हॅलिकॉप्टरने ते शाळेपर्यंत पोहोचत आहेत. गडकरी येणार म्हणून महामार्गाच्या दुरूस्तीचे काम वेगाने सुरू होत पण ते काम काही वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. याचा फटका मात्र वाहन चालकांना बसत आहे. 

Read More