Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नाकाबंदी दरम्यान सिमेंट मिक्सरच्या धडकेत वाहतूक पोलिसांचा मृत्यू

हेड कॉन्स्टेबल कुमार गायकवाड कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नाकाबंदी दरम्यान सिमेंट मिक्सरच्या धडकेत वाहतूक पोलिसांचा मृत्यू

नाशिक : नाशिक पेठ रोड वरील वांगले घाटात नाकाबंदी दरम्यान सिमेंट मिक्सर या वाहनाच्या धडकेत वाहतूक पोलिसांचा मृत्यू झाला आहे. ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक हेड कॉन्स्टेबल कुमार गायकवाड कर्तव्य बजावत असताना त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पेठ रोडच्या करंजाळी जवळ असलेल्या हॉटेल साई किरण जवळ ही घटना घडली. 

रस्ता सुरक्षा सप्ताह दरम्यान ही दुर्देवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुपारी 12:30 च्या दरम्यान ही घटना घडली. पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सिमेंट मिक्सर वाहनसह चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

नाशिक पेठ रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करत असलेल्या कॉन्ट्रॅक्टरच्या गाडीने हा अपघात झाला. ग्रामीण पोलिस दलात यामुळे शोककळा पसरली आहे. नाशिक ग्रामीण पोलिसाचे उत्कृष्ट कबड्डीपटू अशी त्यांची ओळख होती.

Read More