Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ठाणे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवरच ट्रेननं घेतला अचानक पेट!

मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात सायडींगला उभ्या असलेल्या ट्रेनला अचाक आग लागली.

ठाणे स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्मवरच ट्रेननं घेतला अचानक पेट!

ठाणे : मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात सायडींगला उभ्या असलेल्या ट्रेनला अचाक आग लागली.

या भीषण आगीत गाडीचे तीन डबे जळून खाक झालेत. ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ आणि ५ वर ही गाडी उभी होती.

अग्निशमन दल आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं असून ही आग पूर्णपणे विझवण्यात आलीय. 

सुदैवानं या गाडीत कोणताही प्रवासी नसल्यानं या दुर्घटनेत कोणतिही जीवितहानी झाली नाही. ही आग कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्यार कळू शकलेलं नाही.

Read More