Trekker death on siddhagad fort: ट्रेकिंग करताना योग्य खबरदारी न घेतल्यास जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना मुरबाड जवळील सिद्धगडावर घडली आहे. 1100 फूट खोल दरीत पडून गिर्यारोहकाचा मृत्यू झाला आहे. 48 तासाने या गिर्यारोहकाचा मृतदेह सापडला आहे. या घटनेमुळे मुरबाड परिसरातील पर्यटनस्थळांच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
साईराज चव्हाण असे मृत गिर्यारोहकाच नाव आहे. साईराज तो नवीमुंबई भागातील तळोजा परिसरात राहणारा होता. याप्रकरणी मुरबाड ग्रामीण तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. रविवारी सुट्टी असल्याने साईराज हा आपल्या गिर्यारोहक असलेल्या 13 मित्रांच्या सोबत मुरबाड तालुक्यातील सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आले होता. हे सर्व 13 गिर्यारोहक मार्ग चुकले होते. मात्र, काही तासांनी ते सुरक्षितपणे गडावरून खाली उतरण्यात यशस्वी झाले. मात्र दुर्दैवाने चव्हाण एका उंच कड्यावरून घसरला आणि 600 फूट खोल दरीत असलेल्या खडकावर पडला.
घटनेची माहिती मिळताच 20 मिनिटांत शोध आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. ठाणे जिल्हा अधिकारी कार्यलयातून महाराष्ट्र माउंटेनियरिंग रेस्क्यू टीमशी त्वरित संपर्क साधून तातडीने घटनास्थळी पोहचले. मात्र, घाट माथ्यांवर मुसळधार पाऊस, धुके आणि घनदाट जंगल असल्याने रात्री बचाव कार्य थांबवावे लागले. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते पुन्हा सुरू झाले देखील मुसळधार पावसामुळं शोध मोहिमेत अळथळा येत होता. तरी देखील अथक प्रयत्न पथकाने सुरू ठेवले अखेर आज मंगळवारी दुपारच्या सुमारास साईराजचा मृतदेह पथकानं दरीतून बाहेर काढत शवविच्छेदना साठी मुरबाडच्या शासकीय उप जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.