सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हसवतात तर काही व्हिडिओ संदेश देतात. यामध्ये 93 वर्षीय दाम्पत्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. ज्यामध्ये आजोबांनी त्यांच्या पत्नीला एक ग्रॅम सोन्याची माळ भेट म्हणून दिली. या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागचं सत्य समोर आलं आहे.
आपल्याला व्हायरल व्हिडीओमध्ये दिसतंय की, त्या दाम्पत्याला एक दुकानदार माळ अवघ्या 20 रुपयांना देतो. ही माळ पाहताच दोघांच्याही डोळ्यात पाणी येतं. पण या व्हायरल झालेल्या व्हिडीओ मागचं सत्य या दाम्पत्यांनी सांगितलं आहे.
या दुकानाअगोदर हे दाम्पत्य इतर तीन दुकानांमध्ये जातात. पहिल्याच दुकानात या दोघांना भीक मागणारी व्यक्ती समजून हातात एक रुपया देतात. पुढे हे दाम्पत्य इतर दोन दुकांनामध्ये जातात. तिथे त्या आजींना कोणतीच माळ आवडत नाही. मग हे दोघेजण संपूर्ण बाजार फिरुन चौथ्या दुकानात येतात.
येथे या दोघांची चर्चा दुकानदारांच्या कानावर पडली. दाम्पत्यांनी 1300 रुपये आणले होते. पण दुकानदाराने अवघे 20 रुपये घेऊन 2500 रुपयांची माळ भेट दिली. दाम्पत्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर जशी चर्चा आहे. अगदी तशीच चर्चा त्यांच्या कुंटुंबात देखील आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये आपण दिसतोय अशी चर्चा रंगली आहे. पण या सगळ्यात आजींना बऱ्याच दिवसांपासून दागिना घ्यायचा होता तो दिला याचं समाधान आजोबांना आहे.
काय आहे व्हिडीओ
93 वर्षांचे आजोबा बायकोला गळ्यातली सोन्याची माळ आणि वाटी घेण्यासाठी शहरात आले. मात्र ज्वेलर्स मालकानं जे केलं त्यानं मन जिंकलं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल यापेक्षा वेगळं पुण्य ते काय. या व्हिडिओत एका ज्वेलर्सच्या दुकानात 93 वर्षीय आजोबा आणि त्यांची पत्नी आले. बायकोच्या प्रेमाखातर या आजोबांना सोन्याची माळ आणि वाट्या घ्यायच्या असं ते आजोबाब ज्वेलर्सला सांगतात.
त्यावेळी ज्वेलर्स मालक विचारतो किती पैसे आणले. तेव्हा हे आजोबा अकराशे रुपये आणि काही चिल्लर असल्याचं दाखवतात. यानंतर ज्वेलर्सनं जे काही केलं, त्यानं सा-यांचं मन जिंकलंय.. ज्वेलर्सनं हे सर्व पैसे नाकारले आणि आजोबांना सोन्याची माळ देऊ केली. यानंतरही आजोबा ज्वेलर्सला पैसे घेण्यासाठी विनवणी करतात. मात्र दुकानदार पांडुरंगाचा आणि तुमचा आशीर्वाद कल्याणच कल्याण म्हणत फक्त वीस रुपये घेतो. दुकानदाराची ही कृती आणि आजोबांचं बायकोवरील प्रेम याचीच सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.