Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं विकास भवनावर धडकले

आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर धडकले.

आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं विकास भवनावर धडकले

नाशिक : शहराच्या वेशीवर रोखण्यात आलेले आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर धडकले. आदिवासी विकास विभागाच्या राज्यभरातल्या वसतिगृहांत आश्रयाला राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाशी संबंधित काही निर्णयांविरोधात एल्गार पुकारला आहे. 

यासाठी कुठल्याही संघटनेचा आश्रय न घेता विद्यार्थ्यांचं संघटन करून भर पावसाळ्यात, आदिवासी विद्यार्थ्यांनी १३ जुलैला पुणे - नाशिक मोर्चाला सुरुवात केली होती. मात्र त्यांना नाशिकबाहेरच पोलिसांनी रोखलं होतं. 

Read More