Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आगपेटी घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट

 चोंढी शिवारातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंप जवळच ही घटना घडली.

आगपेटी घेऊन जाणाऱ्या ट्रकने घेतला पेट

 मनमाड :  मालेगाव रस्त्यावर चोंढी शिवारात आगपेटी घेऊन जाणा-या ट्रकनं अचानक पेट घेतला. या आगीत ट्रक संपूर्ण जाळून खाक झाला. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काही काळ दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती. 

आगीवर नियंत्रण 

अग्निशामन दलानं शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविलं. तामीळनाडूतून आगपेटी घेऊन हा ट्रक जयपुरला जात होता. चोंढी शिवारातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंप जवळच ही घटना घडली.

ट्रक जळून खाक  

मात्र, ट्रकचालकानं साहसानं जळता ट्रक काही अंतर पुढे नेला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.  मात्र आगीनं, रौद्ररूप धारण केलं. आणि या आगीत संपूर्ण ट्रक जाळून खाक झाला.

Read More