Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दारू पिण्यासाठी आलेल्या तरुणाला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न

एकाने गाडीतून पेट्रोल काढून त्याच्या अंगावर ओतले.

दारू पिण्यासाठी आलेल्या तरुणाला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न

मिरज : मिरजेतील गांधी चौकात दारू दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या तानाजी दंडुगुले या तरुणाला जिवंत पेटवण्याचा प्रयत्न झालाय. महात्मा गांधी चौकातील एका दारू दुकानात दारू पिण्यासाठी तानाजी  आला होता. यावेळी तिथे आलेल्या सहा जणांनी त्याच्या खिशातील रोख अडीच हजार रुपये आणि एक मोबाईल काढून घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. विरोध करणार्‍या दंडुगुडे याच्यावर एकाने गाडीतून पेट्रोल काढून त्याच्या अंगावर ओतले.

पेटवण्याचा प्रयत्न 

यावेळी तानाजीला पेटवण्याचाही प्रयत्न झाला. यांत दंडुगुले हा गंभीर जखमी झाला. घटनेनंतर आरडाओरडा झाल्याने नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलंय.

दहा दिवसांची कोठडी 

या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आलीय. अटक करण्यात आलेल्या काही जणांवर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितलंय. 

Read More