Jitendra Awhad Vs Gopichand Padalkar : विधानभवनाच्या लॉबीमध्ये गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तूफान हाणामारी झाली यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. हा मला मारण्याचा कट होता, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
माध्यमांशी बोलताना आव्हाड म्हणाले की, मुख्यमंत्र्यांशी वेगळ्या विषयावर भेट झाली त्यावेळी विधिमंडळातील हाणामारीचाही विषय निघाला. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण घटना शांतपणे ऐकून घेतली आणि त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की, जे घडलं ते योग्य झालं नाही. मोक्काचे आरोपी जर विधिमंडळात येऊन बसणार आहेत. तर मला या विषयावर काही बोलायचं नाही. मला मारण्याचा प्रयत्न फसल्यानंतर माझा कार्यकर्त्या नितीन देशमुख यांना मारण्यात आलं. यापेक्षा वाईट गोष्ट नाही. गेल्या तीन दिवसांपासून मी पाहतोय, हे लोक मला डोळे वटारून पाहत होते. यावेळी तर यांनी सीमा पार केली आहे.
ते पुढे म्हणाले की, माझा सभागृहातील भाषण झाल्यावर मी त्वरित बाहेर पडून गाडीत बसणार तोच मला फोन आला की नितीनला मारलं आणि मी परत आलो. मी तिथे आल्यावर जी काही घटना कळली आणि व्हिडीओ पाहिला. त्यात नितीन देशमुख यांच्यावर सरळ सरळ हल्ला झाल्याच दिसून आला आहे. त्यांचं प्लॅनिंग मला मारण्याच होतं. कोण आहेत ही माणसं? हे काय कार्यकर्ते होते? हे सगळे खूनातील, दरोडे आणि मोक्कातील आरोपी आहेत. मोक्कातील आरोपी विधिमंडळात येतात आणि हल्ले करतात. हे संसदीय लोकशाहीचे मंदिर आहे.