Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मातंग समाजातील मुलांची नग्न धिंड प्रकरणी दोघांना अटक

मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं अमानुष मारहाण

मातंग समाजातील मुलांची नग्न धिंड प्रकरणी दोघांना अटक

जळगाव : जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात मातंग समाजाच्या मुलांची नग्न धिंड काढून पट्ट्यानं अमानुष मारहाण करण्याची धक्कादायक घटना समोर आली... आणि अवघा महाराष्ट्र ओशाळला. सुरुवातीला या प्रकरणी अटकेसाठी टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी आता दोघांना अटक केलीय. जामनेर तालुक्यातल्या  वाकडी गावातल्या मालकाच्या शेतातल्या विहिरीत पोहायला गेल्यानं ही अमानुष मारहाण केल्याचं पुढं आलंय. मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

मारहाण करणाऱ्या प्रल्हाद कैलास लोहार आणि ईश्वर बळवंत जोशी या दोघांना अटक करण्यात आलीय. दोघांवर अॅट्रोसिटीसह मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या दोघांनी पीडितांवर प्रश्नांचा भडिमार करून पट्ट्यानं जबर मारहाण करत असल्याचं या व्हिडिओत दिसतंय. विशेष म्हणजे मारहाण करणाऱ्या व्यक्तीकडे ही दोघं मुलं कामाला होती. 

या घटनेनंतर लहूजी साळवे संघर्ष सामितीतर्फे पोलिसांत तक्रार देण्यात आली. मात्र सुरूवातीला पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळटाळ करण्यात आल्याचा आरोप होतोय. मात्र माध्यमांमधून टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर पोलिसांची पळापळ सुरू झाली. 

Read More