Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पेणच्या मोतीराम तलावात सापडले मायलेकींचे मृतदेह

दोघी मायलेकींचे मृतदेह पेणच्या मोतीराम तलावात सापडले.  

पेणच्या मोतीराम तलावात सापडले मायलेकींचे मृतदेह

रायगड : पेण शहरातील फणस डोंगरी भागात राहणाऱ्या सुरेखा वाघमारे आणि कोमल वाघमारे या दोघी मायलेकींचे मृतदेह पेणच्या मोतीराम तलावात सापडले. बुधवारी सकाळपासून त्या घरातून निघून गेल्या होत्या. 

दरम्यान, बुधवारी दुपारी मोतीराम तलावात शोध घेत असताना १६ वर्षीय कोमल हिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला होता. त्यानंतर पेण पोलीस अग्निशमन दल आणि सेवाभावी संस्थाच्या मदतीने आई सुरेखा हिचाही शोध सुरू होता. आज सकाळी सुरेखाचा मृतदेह देखील मोतीराम तलावात सापडला. 

या घटनेने पेण परिसरात खळबळ उडाली असून वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत. आता ही आत्महत्या होती की खून याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read More