Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पवना धरणात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

पवना धरणावर फिरण्यासाठी आलेल्या दोन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय.

पवना धरणात दोन युवक बुडाले, एकाचा मृतदेह सापडला

पुणे : पवना धरणावर फिरण्यासाठी आलेल्या एका युवकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय. यातील एका युवकाचा मृतदेह सापडला असून दुस-या युवकाला शोधण्याचं काम अजूनही सुरू आहे. मोहीत जाधव आणि वेदप्रकाश राणा अशी या दोघांची नावं आहेत.

यातील एक युवक हा चाळीसगावचा असून दुसरा नागपूरचा असल्याची प्राथमिक माहिती आहे. पाण्यात पोहण्यासाठी उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचं सांगण्यात येतंय. हे तरूण पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरीला होते. या दोघांबरोबर आणखी ७ जण असे एकूण ९ जण फिरण्यासाठी पवना धरणावर आले होते. 

 

Read More