Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

परभणी येथे दोन गटात राडा, जाळपोळीनंतर तणाव

परभणी जिल्ह्यातील पालम येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात हाणामारी झाली.  

परभणी येथे दोन गटात राडा, जाळपोळीनंतर तणाव

परभणी : जिल्ह्यातील पालम येथे पूर्व वैमनस्यातून दोन गटात बुधवारी रात्रीच्या सुमारास हाणामारी झाली. किरकोळ कारणातून झालेल्या हाणामारीचे पर्यवसान जाळपोळीत झाले. रस्त्यावरील काही वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यात पोलिसांच्या एका गाडीचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. 

पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवून आगीवर अग्निशमन दलाच्या सहाय्याने नियंत्रण मिळवले. तत्पूर्वी शहरात तनाणपूर्ण परिस्थिती होती. आता पालम शहर पूर्वपदावर आले आहे. येथील व्यवहार हळहळू सुरळीत होत आहेत.

Read More