Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

एका गुंडाला सोडून 'ती' दुसऱ्याच गुंडासोबत राहायला लागली, प्रेम प्रकरणातून नागपुरात दोन खून

Nagpur Crime News: नागपूरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर येत आहे. दोन घटनांमध्ये प्रेमप्रकरणातून दोघांची हत्या करण्यात आली आहे.

 एका गुंडाला सोडून 'ती' दुसऱ्याच गुंडासोबत राहायला लागली, प्रेम प्रकरणातून नागपुरात दोन खून

Nagpur Crime News: नागपूरमध्ये एक धक्कादायक बातमी समोर येतेय. व्हॅलेनटाइन डेच्या दिवशी प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून दोघांची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेले दोघेही सराईत गुन्हेगार होते. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Nagpur News Today)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 वर्षांचा सूरज उर्फ बिहारी अमीर महातो अलीकडेच दोन वर्षांपूर्वी शिक्षा भोगून वर्धा तुरुंगातून सुटला होता. तो अजनी पोलीस स्थानक परिसरात नाइक नगरमध्ये फिरत होता. त्याचदरम्यान त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणात नाइक नगर परिसरात 26 वर्षीय विपिन राजकुमार गुप्ता, 26 वर्षीय अनिल आणि 27 वर्षीय विजय यांना अटक करण्यात आले आहे. 

प्राथमिक माहितीनुसार, विपिन राजकुमार गुप्ता याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, काही कारणास्तव त्यांच्यात वाद झाले आणि मुलीने ब्रेकअप केले. त्यानंतर या मुलीने बिहारीसोबत मैत्री केली. बिहारीने अलीकडेच गुप्ताला मुलीपासून लांब राहण्याचा इशारा दिला होता. त्यामुळं दोघांच्यात विस्तवही जात नव्हता. या कारणामुळं दोघांत सतत वाद होत होते. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारी जेव्हा बाइकवरुन जात होता. त्याचवेळी त्याच्यावर आरोपींनी हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर बिहारी तिथून पळाला आणि एका घरात जाऊन लपला. मात्र तिथेही आरोपींनी त्याला पकडून त्याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. 

पंचपावली परिसरातील दुसरी घटना

पंचपावली परिसरातील हत्येची अशीच एक घटना घडली आहे. प्रेम प्रकरण सोडवण्यासाठी गेलेल्या अभिषेक उर्फ संजय गुलाबे याच्यावर धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अभिषेकला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. 23 वर्षीय अभिषेकदेखील सराईत गुन्हेगार होता. या प्रकरणात पोलिसांनी 28 वर्षीय रोहित नाहरकर आणि 30 वर्षीय श्याम बाबू कुसेरे आणि 20 वर्षीय राजकुमार लचलवार यांना अटक केली आहे. पोलिस या प्रकरणात अधिक तपास करत आहेत. 

Read More