Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Crime : पुणे पुन्हा हादरलं ! मामाच्या मुलासमोर तरुणीवर गँगरेप तर, घरातच बापाचा मुलीवर बलात्कार

पुण्यात 24 तासात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. जन्मदात्या पित्याने ममुलीवर बलात्कार केला आहे आहे. तर, दुसऱ्या घटनेत मामाच्या मुलासमोरच तरुणीवर अत्याचार झाला आहे. 

Crime : पुणे पुन्हा हादरलं !  मामाच्या मुलासमोर तरुणीवर गँगरेप तर, घरातच बापाचा मुलीवर बलात्कार

Pune Crime News: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर बलात्कार झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. अशातच पुण्यात 24 तासात बलात्काराच्या दोन घटना घडल्या आहेत. लैंगिक अत्याचाराच्या घटनेनं पुणे पुन्हा हादरलं आहे. वडिलांकडूनच 14 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. तर, दुसऱ्या घटनेत ममााच्या मुलासोबत फिरत असलेल्या तरुणीवर गँगरेप झाला आहे.  

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातील नांदेड सिटी परिसरात घडली आहे.  स्वतःच्या 14 वर्षे मुलीवर नराधम बाप 8 महिने लैंगिक अत्याचार करत होता, आई घराबाहेर गेल्यावर नराधम बाप मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करत होता.  याप्रकरणी पुण्यातील नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा झाला आहे.  पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय तर नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.  बाल हक्क समितीने हा प्रकार उघडकीस आणलाय त्यानुसार गुन्हा दाखल करत नराधम बापाला काल बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. 

तर, दुसरी घटना शिरुर तालुक्यात कारेगाव परिसरात घडली आहे. कोरेगाव परिसरात राहणारी तरुणी ती राहत असलेल्या इमारतीच्या परिसरात मामाच्या मुलासह फेरफट मारत होती.  दारु पिऊन आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना चाकुचा धाक दाखवत लाथा बुक्क्यानी मारहाण केली. यांनतर आरोपींनी मामाच्या मुलाला संबधीत तरुणीवर बलात्कार करण्यास सांगितले. आरोपींनी याचा व्हिडिओ बनवला. यानंतर दोंन्ही आरोपींनी देखील तरुणीवर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या अंगावरील सोनं काढुन पोबारा केला. या प्रकरणी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल जाला आहे.  रांजणगाव पोलिसांनी तात्काळ त्या दोन नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  अमोल नारायण पोटे (वय 25) आणि किशोर रामभाऊ काळे (वय 29) अशी अटक केलेल्या दोन आरोपीची नावे आहेत. 

Read More