Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

बीड: 'मला जिजू आणि तिला दीदी म्हणायचं,' नराधम शिक्षकाने 200 विद्यार्थ्यांना खडसावलं; बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासे

बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंकिग छळ प्रकरणात दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली आहे  

बीड: 'मला जिजू आणि तिला दीदी म्हणायचं,' नराधम शिक्षकाने 200 विद्यार्थ्यांना खडसावलं; बलात्कार प्रकरणी धक्कादायक खुलासे

बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंकिग छळ प्रकरणात दोन नराधम शिक्षकांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता यात आणखीन धक्कादायक आणि किळसवाणा प्रकार समोर आला आहे. नराधम आरोपी प्रशांत खाटोकरने 200 विद्यार्थी आणि विद्यार्थींनींना स्वतःला जीजू अन् पिड़ीत विद्यार्थीनीला दीदी म्हणायला सांगितलं होतं.

फोटोत दिसणाऱ्या या नराधमाकडे नीट पाहा. हा नराधम आहे बीडचा प्रशांत खाटोकर. याच नराधमाने शिक्षकी पेक्षाला काळीमा फासला आहे. बीडमधील उमाकिरण या खासगी क्लासेसमध्ये हा नराधम प्राध्यापक म्हणून काम करत होता. शिक्षकाच्या वेशातील याच नराधमाने बीडच्या त्या अल्पवयीन पिडीतेचा लैंगिक छळ केला आहे. आता या नराधमाची अजूनही अनेक काळी कृत्य आता समोर येत आहेत.

नराधम प्रशांत खाटोकरने दोनशे विद्यार्थ्यांना स्वतःला जीजू आणि या पीडित विद्यार्थीनीला दीदी म्हणायला लावलं होतं. या नराधमाने पीडित विद्यार्थीनीला गर्लफ्रेंड म्हणून सर्व विद्यार्थ्यांसमोर जाहीर केलं होतं. एवढंच नाही तर या नराधमाने सर्वांसमोर पीडितेचं चुंबन घेऊन सर्वच मर्यादा ओलांडल्या होत्या. पीडितेच्या जबाबातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि त्याला साथ होती ती क्लासेसचा मालक असलेला विजय पवार. या नराधमांनी आणखी कोणत्या विद्यार्थीनींना त्रास दिला असल्याच पोलिसांत तक्रार देण्याचा आवाहन पोलिसांनी केला आहे. 

द बीड फाइल्स 2.0 - विकृतीचा क्लास: पीडितेच्या जबाबातून धक्कादायक माहिती

- नराधम प्रशांत खाटोकरकडून वर्षभरापासून पीडीतेचा लैंगिक छळ 
- वर्गातच अश्लील वर्तणूक 
- हीच माझी गर्लफ्रेंड म्हणत दोनशे विद्यार्थ्यांसमोर चुंबन घेतलं
- नराधम प्रशांत खाटोकरने विद्यार्थ्यांना स्वतःला जीजू तर पीडितेला दिदि म्हणायला सांगितलं होतं 
- नराधमाने पीडितेला आतापर्यंत 3 वेळा कपडे काढायला लावले 
- छळाला कंटाळून पीडितेनं क्लासला जाणं बंद केलं होतं
- प्रशांत खाटोकरने धमकी देऊन पुन्हा क्लासला यायला भाग पाडला होतं


शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या बीडच्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे.  नराधम शिक्षक प्रशांत खाटोकर आपल्यावर अत्याचार करत असल्याची तक्रार पीडितेने पहिल्यांदा क्लासचा मालक असलेल्या विजय पवारला सांगितली. मात्र प्रशांत खाटोकरवर कारवाई करणं तर बाजूलाच क्लास चालक विजय पवारही या खाटोकरसोबत सामील होऊन मुलीचा लैंगिक छळ करत राहिला.

शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या नराधम प्रशांत खाटोकर आणि विजय पवार या दोन्ही नराधमांवर कठोर कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी केली आहे.  बीडमधील या प्रकाराने राज्यात प्रचं संताप व्यक्त करण्यात येत आहे. नराधम प्रशांत खाटोकर आणि विजय पवार दोघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र त्यांना कठोरात कठोर शिक्षा देणं गरजेचं आहे.

Read More