Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भरधाव वाहनाने दुचाकी दाम्पत्यास चिरडले, संतप्त जमावाकडून महामार्गावर दगडफेक

Yavatmal Accident​ : एका भरधाव वाहनाने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

भरधाव वाहनाने दुचाकी दाम्पत्यास चिरडले, संतप्त जमावाकडून महामार्गावर दगडफेक

यवतमाळ : Yavatmal Accident : एका भरधाव वाहनाने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात भारी गावाजवळ झाला. अपघाताचे वृत्त समजतात भारी येथील ग्रामस्थ संतप्त झालेत. त्यांनी नागपूर - तुळजापूर राज्य महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. यावेळी काही ग्रामस्थांनी काही वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे तणावात भर पडली. महार्गावरील गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

भारी गावाजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिली. भरधाव वाहनाच्या धडकेने येलनकर हे दाम्पत्य जागीच ठार झाल्याची बातमी गावात पसरली. त्यानंतर गावातील जमाव आक्रमक झाला, त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून तासभर वाहतूक रोखून धरली. जमावाने वाहतूक पोलिसांवर रोष व्यक्त करीत काही वाहनांवर दगडफेकदेखील केली. त्यामुळे पोलिसांना जमाव नियंत्रित करण्यासाठी सौम्य लाठीमार करावा लागला. 

पांढरकवडा बायपास चौकीवर वाहतूक पोलीस खासगी व्यक्तींची ड्युटी लाऊन ओव्हरलोड आणि भरधाव वाहतुकीकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच हे अपघात होत असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला. 

Read More