Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली, यावेळी कारण वेगळंय...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन वंशजांमधील लव्ह अँड हेट रिलेशन सर्वांनाच माहित आहे... आता पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यात जुंपली, यावेळी कारण वेगळंय...

तुषार तपासे, झी २४ तास, सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन वंशजांमधील लव्ह अँड हेट रिलेशन सर्वांनाच माहित आहे... आता पुन्हा एकदा उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय...साता-याला उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाद तसा नवा नाही. आता पुन्हा एकदा दोन्ही राजेंमध्ये युद्ध छेडलं गेलंय...उदयनराजेंनी थेट शिवेंद्रराजेंना चिरडण्याचीच भाषा केलीय. दोघांमधल्या वादाला कारण ठरलीय ती पंडित ऑटोमोटीव्ह कंपनी... 

शिवेंद्रराजेंनी कंपनी बेकायदा ताब्यात घेऊन कामगारांवर अन्याय केल्याचा आरोप उदयनराजेंनी केलाय. यावरून आक्रमक झालेल्या उदयनराजेंनी लोकशाही नसती, राजेशाही असती तर हत्तीच्या पायाखाली दिलं असतं असा घणाघात शिवेंद्रराजेंचं नाव न घेता केला. 

खरंतर दोन्ही राजे एकाच पक्षात... एक भाजप खासदार तर दुसरे भाजपचे आमदार... दोघांमधलं वैर आणि जिव्हाळा हा उभ्या महाराष्ट्राला माहितीये... मागे उदयनराजेंनी पुष्पा सिनेमातील गाण्यावर लुंगी घालून नाच केला होता...

उदयनराजे भाजपवासी झाल्यानंतर दोघांनी एकमेकांची भेट घेऊन मनोमिलन झाल्याची दवंडी पिटली होती... मात्र दोघांमध्ये धुसफूस कायम असल्याचंच या वादावरून दिसतंय.. 

Read More