Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंचे सडेतोड उत्तर

राज ठाकरे यांच्या विधानावर खासदार उदयनराजेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

राज ठाकरेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंचे सडेतोड उत्तर

सातारा : राज ठाकरे यांच्या विधानावर खासदार उदयनराजेंनी सडेतोड उत्तर दिले आहे. 

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कसे होऊ शकत नाही, डोक्यातून नव्हे हृदयातून करायचं ठरवलं तर का होऊ शकत नाही, असा सवाल खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.  दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा ‘सत्तेत असणाऱ्यांनी शिवाजी महाराजांचे स्मारक होणार असे स्वप्न दाखवले आहे.

 ते कधीच पूर्ण होणार नाही, स्मारकाचे फक्त स्वप्न असल्याची टीका त्यानी केली होती.  स्टेचू ऑफ लिबर्टी होऊ शकतो तर स्मारक का होणार नाही, राज ठाकरे माझा मित्र,कोणत्या अँगल ने बोलला माहीत नाही’, आपण सारे लोकशाहीतील राजे आहोत त्यामुळे स्मारक होईलच असेही ते म्हणाले

 

Read More