Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Udddhav Thackeray: 'विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठी चूक', उद्धव ठाकरेंची कबुली, '3 पक्ष एकत्र...'

Udddhav Thackeray Admits Mistake: उद्धव ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

Udddhav Thackeray: 'विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठी चूक', उद्धव ठाकरेंची कबुली, '3 पक्ष एकत्र...'

Udddhav Thackeray Admits Mistake: विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठी चूक झाली असे विधान उद्धव ठाकरेंनी केले. 'सामना'साठी खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. 

'मोदींनी बहुमत गमावल त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची'

एक वर्षापुर्वी नरेंद्र मोदींनी लोकसभेतील बहुमत गमावलं. तुम्ही सर्वांना सदा सर्वकाळ मुर्ख बनवू शकत नाही. जे गारुड टाकलं होतं त्यातून लाकं बाहेर पडली. 2014 साली 10 वर्षांची मुलं होती ती आता 21 व्या वर्षात आली. नोकरीचं आश्वासन दिलेल्यांची स्थिती ते पाहतायत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  मोदींनी बहुमत गमावलं त्यात महाराष्ट्राची भूमिका महत्वाची होती. महाविकास आघाडीने 31 जागा जिंकल्या. मविआ एकत्र येऊन लढली. संविधान धोक्यात असल्याचं लोकांनी ओळखलं. हे नको म्हणून लोकांनी मतदान केलं. लोकांना तणावग्रस्त ठेवायचं. देशात, जातीपातीत, समाजात अस्थिरता ठेवायची हे भाजपचे राजकारण असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

लोकसभेला कमावलं ते विधानसभेत गमावलं 

लोकसभेला कमावलं ते विधानसभेत गमावलं हे संजय राऊतांचं विधान उद्धव ठाकरेंनी मान्य केलं. तसेच यावर सविस्तर स्पष्टीकरणही दिलं. ईव्हीएम घोटाळा, बोगस मतदान, मतदार कसे वाढले यावर चर्चा सुरु आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल आता माहिती समोर येतेय. मतदारसंघ छोटा होता तेव्हा स्पर्धा वाढत जाते. 1-2 पक्ष एकत्र आल्यावर थोडीशी खेचाखेची होती. सेना-भाजपचं पण असं व्हायचं.मविआ म्हणून पहिल्यांदा लोकसभा लढलो.  लोकसभेवेळी 5-6 वेळा जिंकलेले मतदारसंघ शिवसेनेने आपल्याला जिंकायचे म्हणून सोडले. विधानसभेवेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेची सुरु राहिली. आताच खेचाखेची असेल तर पुढे काय होणार? असं लोकांना वाटल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.

'लोकसभेचं यश सर्वांच्या डोक्यात गेलं'

लोकसभेवेळी मला प्रचाराला वेळ मिळाला. मी फेब्रुवारीत प्रचार सुरु केला. तेव्हा माझ्यासमोर माझे उमेदवार होते पण निशाणी नव्हती. विधानसभेवेळी निशाणी होती पण जागा कोणत्या आणि जागांवर उमेदवार कोणते हे निश्चित होतं. ही जाबाबदारी स्वीकारायला हवी. आपल्याकडून झालेली सर्वात मोठी चूक होती. ती चूक परत करायची नाही. समन्वयाच्या अभावापेक्षा लोकसभेचं यश सर्वांच्या डोक्यात गेलं. लोकसभेवेळी आपलेपण होतं. विधानसभेत मीपणा आल्याचे ठाकरे म्हणाले.  

 'प्रतिकूल काळात आपण सरकार चालवून दाखवलं'

मी मुख्यमंत्री असताना न मागता शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्ज मोफत केलं होत.शेतकऱ्यांची कर्जमाफी पुढे ढकलली. जे कर्ज नियमित फेडतात त्यांना दिलासा दिल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. लोकसभेवेळी देशाचा विचार करुन संविधान बदलणार हा देशाचा मुद्दा होता. पण विधानसभेवेळी राज्यावर केंद्रीत व्हायला हवी होती ती झाली नाही. प्रतिकूल काळात आपण सरकार चालवून दाखवलं. कोरोना काळात गंगेत प्रेत वाहत होती. गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या होत्या. महाराष्ट्रात जनता आणि प्रशासनाच्या साथीने अशी परिस्थिती उद्धवली नाही. प्रतिकूल काळात आम्ही सरकार चालवून दाखवल्याचे ठाकरे म्हणाले. 

' आम्ही केलेली काम लोकांना सांगू शकलो नाही'

नेहमी आधी आघाडी-युती होते. मग निवडणुका होतात. पण आमच्यावेळी उलटा प्रवास झाला. अत्यंत प्रतिकूल काळात आम्ही सरकार चालवलं. केंद्र सरकार किंवा अर्थ व्यवस्थेचं गाडं रुळावर नव्हतं. शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था संभाळली.  पैशाचा पाऊस पडला, त्यात बरीच लोकं वाहून गेली. आपण केलेली काम लोकांना सांगू शकलो नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा सुव्यवस्था चांगली होती. सर्वांना समानतेने वागवले. गरज होती तेव्हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून गेलो. जनतेने मला त्यांच्यातला एक मानल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Read More