Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

दोन्ही शिवसेनेचं लक्ष्य मुंबई पालिका निवडणूक; कोण मारणार बाजी?

Shivsena Mission BMC Election: आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून रणशिंग फुंकण्यात आलंय. 

दोन्ही शिवसेनेचं लक्ष्य मुंबई पालिका निवडणूक; कोण मारणार बाजी?

Shivsena Mission BMC Election: आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून तयारी सुरु करण्यात आलीय.. ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. तर तिकडे पालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार असा दावा एकनाथ शिंदेंकडून करण्यात आलाय.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेकडून रणशिंग फुंकण्यात आलंय. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत मुंबईतील पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देत तयारीला लागण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिलेत. तर दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वास एकनाथ शिंदेंनी
व्यक्त केलाय.

आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता ठाकरेंची शिवसेना मुंबईतील विविध मुद्द्यावरुन चांगलीच आक्रमक झालीय.. मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारलाय त्यामुळे पाणी प्रश्नावरुन आदित्य ठाकरेंनी सरकारला अल्टिमेटम दिलाय. दरम्यान यानंतर एकनाथ
शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवर पलटवार केलाय.

आदित्य ठाकरेंनी दिलेल्या मोर्चाच्या इशाऱ्यावरुन भाजप आमदार प्रसाद लाड यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. आदित्य ठाकरेंनी मुंबई पालिकेसंदर्भात बोलू नये असं म्हणत प्रसाद लाड यांनी शरसंधान साधलंय.

आगामी पालिका निवडणुकींसाठी दोन्ही शिवसेनेकडून मोर्चेबांधणी सुरु करण्यात आलीय.. ठाकरेंची शिवसेना मुंबईमधील विविध प्रश्नावरुन आक्रमक झालीय.. तर दुसरीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुय. त्यामुळे दोन्ही शिवसेनेकडून चांगलाच जोर लावला जात असून आगामी काळात पालिकेचं मैदान कोण मारणार? याकडे आता लक्ष लागलंय.

Read More