Sanjay Raut Slams DCM Eknath Shinde: उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सभागृहात टुरिस्टप्रमाणं येत असल्याचा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधान परिषदेतील भाषणादरम्यान लगावला. मात्र आता या टीकेला ठाकरेंच्या पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलं आहे.
"एकनाथ शिंदे यांच्या म्हणण्याला महाराष्ट्रात आता तसे काही महत्त्व राहिले नाही. जे मुख्यमंत्री बोलतात त्याला महत्त्व आहे. एकनाथ शिंदे यांचा आता कोण ऐकतं? कोणीही ऐकत नाही," असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. "लिहून दिलेली भाषणे वाचायची. टीवल्या बावल्या करायच्या. याच्या त्याच्यावर बोलायचं. याच्यावर काय साध्य होणार?" असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना, "पैसे देऊन स्वतः सत्कार करून घ्यायचे. पुरस्कार विकत घ्यायचे. याच्या पलीकडे यांचं भविष्य काय?" असा टोलाही राऊतांनी लगावला.
"2014 काय झालं त्यांना विचारा. आमच्याशी युती तोडून भारतीय जनता पक्षानेदेखील हिंदुत्व सोडलं होतं. एकनाथ शिंदे यांचा इतिहास आणि अभ्यास खूप कच्चा आहे. त्यांना नव्याने शाळेत जावं लागेल. माणसाच्या डोक्यावरती अटकेची टांगती तलवार असेल तर चौकशीची टांगती तलवार असेल तर तो भ्रमिष्ट होतो. एकनाथ शिंदे यांचा देखील तसेच झाले आहे," असा टोला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राऊतांनी लगावला. "2019 साली आम्ही जे केलं त्यात आपणही सहभागी होतात. अडीच वर्ष त्याआधी 2014 साली भारतीय जनता पक्षाने हिंदुत्ववादी शिवसेनेची फारकत घेतली, तेव्हाही आपण त्या निर्णयात सहभागी होतात," अशी आठवण राऊतांनी करुन दिली.
"देवेंद्र फडणवीस यांना जे म्हणायचं आहे ते म्हणू द्या. त्यांनी उद्धव ठाकरे साहेब यांच्यावर टीका करू द्या त्यांना दुसरं कार्यक्रम नाही आहे. तुम्ही समोर पाहत आहात शिंदे आणि फडणवीस यांच्यात कसे वॉर युद्ध सुरू आहे, हे स्पष्ट दिसत आहे. रोज दिसत आहे. अनेक निर्णय जे भ्रष्टाचारासंदर्भात होते, ज्यांच्यावर भ्रष्टाचार सुरू होता असे निर्णय देवेंद्र फडणवीस थांबवले त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत केले. अशाच निर्णयात उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. असेच आधीच्या नगरविकास मंत्री यांचे किंवा अन्य मंत्री यांचे यातून भ्रष्टाचाराला चालना मिळेल दलाल चालना मिळेल अशा निर्णयाला उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदन केले पाहिजे," असं राऊत म्हणाले. पुढे बोलताना, "तुम्ही भ्रष्टाचार याला चालना देणारे खतपाणी घालणारे आधीच्या मुख्यमंत्री यांचे निर्णयात थांबवले आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचे आहे म्हणून आम्ही त्यांचे अभिनंदन करतो आम्ही रडीचे डाव खेळत नाही," असा टोला राऊतांनी लगावला.