Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'शिवाजी महाराजांना अरे-तुरे करायला अमित शाहांची जीभ धजावते कशी?' राऊतांचा सवाल; म्हणाले, 'मला गाढव म्हणून...'

Amit Shah Raigad Speech Chhatrapati Shivaji Maharaj: अमित शाह यांनी शिवरायांच्या पुण्यतिथीदिनी केलेल्या भाषणावरुन नोंदवण्यात आला आक्षेप

'शिवाजी महाराजांना अरे-तुरे करायला अमित शाहांची जीभ धजावते कशी?' राऊतांचा सवाल; म्हणाले, 'मला गाढव म्हणून...'

Amit Shah Raigad Speech Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमादरम्यान शनिवारी किल्ले रायगडावरुन भाषण करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यावरुन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अभय आहे का?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे-तुरे करायला?

अमित शाहांच्या रायगड दौऱ्याबद्दल बोलताना संजय राऊतांनी, "गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख शिवाजी शिवाजी म्हणून एकेरी शब्दांमध्ये केला आहे. ते छत्रपती आहेत. शिवाजी महाराज आहेत हे या देशाच्या गृहमंत्र्यांना माहित नाही का? 'शिवाजीने यह किया... शिवाजीने ओ किया' ही भाषा आहे का तुमची? महाराजांना अरे-तुरे करायला तुमची जीभ कशी धजावते?" अशा शब्दांमध्ये आपला संताप व्यक्त केला.

फालतू नकली हिंदुत्ववाले, हे डरपोक...

तसेच पुढे, "काय करत आहेत देवेंद्र फडणवीस? हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात. देशाच्या गृहमंत्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा अभय आहे का?" असा सवाल राऊत यांनी उपस्थित करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर निशाणा साधला. "एस. एन. सी. पक्षाचे लोक कुठे आहेत? फालतू नकली हिंदुत्ववाले, हे डरपोक आणि भित्रे लोक आहेत आणि यांचं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम ढोंगी आहे," असं म्हणत राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षावरही निशाणा साधला.

नक्की वाचा >> 'गुजरातच्या नेत्यांना...'; अमित शाहांनी औरंगजेबच्या कबरीचा केलेला 'तो' उल्लेख ऐकून राऊतांचा संतप्त सवाल

मला गाढव म्हणून हा अपमान लपणार आहे का?

संजय राऊत गाढव म्हणून ट्वीट केल्याचा मुद्दा उपस्थित करत राऊतांना पत्रकारांकडून प्रश्न विचारण्यात आला. त्यावरुन राऊतांनी, "उंदीर म्हणू द्या, गाढव म्हणून द्या म्हणून काय सत्य लपत आहे का? अमित शहांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणून अपमान केला ना? मला गाढव म्हणून हा अपमान लपणार आहे का?" असा सवाल उपस्थित केला. "उंदीर आणि तुम्हाला कुडतरून ठेवलं आहे पूर्ण आणि आमची मेहनत आहे ना गाढवासारखी? गाढव मेहनतच करतो महाराष्ट्रासाठी," असंही राऊत म्हणाले. 

द्रौपदीचं वस्त्रहरण होताना...

"तुम्हाला लाज वाटली पाहिजे छत्रपतींचा अपमान होतो आहे आणि तुम्ही माना डोलवत आहात. द्रौपदीचं वस्त्रहरण होताना जसे पांडव खाली मान घालून बसले होते तसे तुम्ही काल बसले होतात," असा टोला राऊतांनी लगावला. 

Read More