Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance: 5 जुलै 2025 रोजी जवळपास 20 वर्षानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन ठाकरे बंधूची युती होणार अशी चर्चा रंगली आहे. ठाकरे बंधूं एकत्र महापालिका निवडणुक लढवणार असल्याची देखील जोरदार चर्चा रंगली. आता मात्र, या चर्चेत मोठा ट्विस्ट आला आहे. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीबाबत सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे.
मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्र आले. उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे राजकीय युती करणार का? असा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडला. मात्र, याबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येण्याचं ठरलं होतं. ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही. अशी राज ठाकरेंच्या मनसेची भूमिका असल्याचे समजते. मनसेतील वरिष्ठ सूत्रांकडून झी 24 तासला ही माहिती मिळाली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं मनसेतून सांगण्यात आलंय. झी 24 तासला सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मराठीच्या मुद्यावर एकत्र येण्याचं ठरलं होतं. पण राजकीय युतीचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं मनसेतल्या सूत्रांनी सांगितलंय. अजून राजकीय युती झाली नसल्याचं सांगून मनसेनं शिवसैनिकांची अस्वस्थता वाढवली आहे.
मराठी भाषा संदर्भात राज आणि उद्धव ठाकरे दोघांनी टिकून धरायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं असून युतीबाबत माझं त्यांच्याशी बोलणं झालं नसल्याची प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावर यांनी दिली. तर, दोन्ही भावांनी एकत्र यावं. आता त्याची अजून पुढे चर्चा होईल. मात्र, महाराष्ट्राच्या हिताचा आहे ते आम्ही करु अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी म्हटल आहे. प्रवक्त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना राज ठाकरे यांनी केल्या आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे. महापालिका निवडणुका जाहीर झाल्यावर शिवसेना-मनसेच्या युतीचं पाहू. उद्धव ठाकरे यांनीही वेट अँण्ड वॉचची भूमिका घेतली आहे.