Uddhav Thackeray Raj Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येणार. शिवसेना मनसे युती होणार अशी चर्चा महाराष्ट्राच्या रंगली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या युतीबाबात सकारात्मक चर्चा सुरु आहेत. युती झाली तरी जागा वाटपाचा विषय कठिण ठरणार आहे. 84 नगरसेवक निवडून आले, 44 पक्ष सोडून गेले, आता एकही नगरसेवक नाही. मनसेचे राजकीय गणित ठाकरे कसे सोडवणार? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मनसेला युतीचा नेमका काय प्रस्ताव द्यायचा असा मोठा पेच ठाकरे गटासमोर आहे. कोणत्या जागांसाठी प्रस्ताव द्यायचा या कोंडीत ठाकरे गट अडकला आहे. कारण ठाकरे गट आणि मनसेचा काही भागात मतदारांचे समसमान प्राबल्य असल्याने प्रस्ताव नेमका द्यायचा काय असा प्रश्न पडला आहे. 2017 साली ठाकरे गटाचे 84 नगरसेवक निवडून आलेत. त्यातील आता 44 नगरसेवकांनी पक्षाला सोडून गेले आहेत, तर मनसेकडे आता एकही नगरसेवक नाही. त्यामुळे आमची ताकद जास्त असून आमच्या अटी शर्तींवर युती व्हायला हवी अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि ठाकरे गटाची युती भाजपचे वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं ठाकरे गटाच्या काही नेत्यांना वाटतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर सत्ताधारी महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. 100 टक्के महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची भाजपची रणनीती आहे. विशेषतः यांत भाजप आक्रमक दिसून येत आहे.
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत युतीसाठी सकारात्मक पाऊल उचलल्याची माहिती मिळतेय.. मनसेसोबत युती करायची की नाही असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी या बैठकीत माजी नगरसेवकांना विचारला. यावेळी युती केली तर फायदा होईल, कारण मुंबईत युतीसंदर्भात अनुकूल वातावरण आहे अशी माहिती माजी नगरसेवकांनी ठाकरेंना दिली.