Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्याच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे.या प्रकरणी आज याचिकेवर सुनावणी करण्यात येणार होती. सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणी सुनावणी पार पडली. ज्यामध्ये न्यायमूर्ती जोयमल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणी करण्यात आली. यामध्ये मुख्य याचिकेवर निर्णय करणे योग्य राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सुनावणीवेळी म्हटलं. या प्रकरणी पुढील सुनावणी ही ऑगस्ट महिन्यात होईल असं म्हटलं. अशातच जर कोणत्या निवडणुका लागल्या तर त्या लढा असं देखील यावेळी न्यायालयाने स्पष्ट केलं.
दरम्यान, ऑगस्टमध्ये निकाल देणार असतील तर नक्कीच एक समाधानकारक गोष्ट आहे. शेवटची आशा आमची सर्वोच्च न्यायालयाच आहे. त्यामुळे या चोरीच्या प्रकरणाचा न्याय निवाडा होईल. कारण आज जे आमच चिन्ह चोरलं गेलं आहे. कदाचित किंवा निवडणूक आयोगाला निवडणुकीचे चिन्ह देण्याचा अधिकार आहे. मात्र, पक्षाचे नाव बदलण्याचा अधिकार त्यांना नाही. तो निवडणूक आयोगाचा अधिकार नाहीये. एकाच नाव उचलून दुसऱ्याला देयचं ते आम्ही कधीच मान्य करू शकत नाही. त्यामुळे हा निवडणूक अधिकाऱ्यांना नाव देण्याचा अधिकार नाही.
गडकिल्ल्यांचं संवर्धन गरजेचं- ठाकरे
महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाला आहे. यावेळी गडकिल्ल्यांचं संवर्धन गरजेचं असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावर बोलताना किल्ल्यांच्या संवर्धनाकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केलाय. तर आता आपली जबाबदारी वाढलीय आहे. हे स्थान असंच टीकून राहण्यासाठी केवळ निधी देऊन भागणार नाही तर सरकारने किल्ल्यांच्या संवर्धनासंदर्भात, देखभालीसंदर्भात कायम स्वरूपी कार्यक्रम आखायला हवा अशी मागणी अंबादास दानवेंनी केली आहे.