Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'हे तर फडणवीसांना बदनाम...', उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काय म्हणाले ते?

Uddhav Thackeray : पावसाळी अधिवेशन सुरु असून उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले असताना त्यांचं मुख्यमंत्र्यांबद्दलचं एक विधान गाजतंय, ते एका प्रश्नावर म्हणाले की, 'हे तर फडणवीसांना बदनाम...'. नेमकं कुठल्या प्रकरणी ते असं म्हणाले पाहूयात. 

'हे तर फडणवीसांना बदनाम...', उद्धव ठाकरेंचं मोठं विधान; काय म्हणाले ते?

Uddhav Thackeray : आज सकाळपासूनच चर्चा आहे ती आमदार संजय गायकवाडांच्या राड्याची, स्वत:ला शिळ अन्न मिळाल्यामुळे संजय गायकवाडांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला बेदम मारहाण केली. सध्या या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. खराब डाळ आणि भात संजय गायकवाड यांना देण्यात आला. डाळीची दुर्गंधी पाहून संजय गायकवाड भडकले आणि थेट बनियन टॉवेलवरच त्यांनी कॅन्टीन गाठलं आणि कॅन्टिन चालकाला बेदम मारहाण केली. सुरुवातीला  जोरदार कानशिलात लगावली त्यानंतर त्यांनी कॅन्टीन चालकाला ढकलंल, तो खाली पडला, इतकंच नाही तर गायकवाडांनी त्याला पोटात गुद्देही मारले. या घटनेचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. उद्धव ठाकरे आज विधिमंडळात आले असताना त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना संजय गायकवाड यांच्या कृत्याबद्दल विचारण्यात आले. 

'हे तर फडणवीसांना बदनाम...'

उद्धव ठाकरे संजय गायकवाड हे प्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बदनामीसाठी काढले गेले असावे असा, वक्तव्य करत संशय व्यक्त केला आहे. सरकारमध्ये काहीतरी चाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. तसंच ते म्हणाले की, गायकवाडांवर कारवाई करण्याचे आदेश सीएम यांनी दिलं असल्याच माझ्या कानावर आलं आहे. पण ही कारवाई होते की नाही ते काही दिवसांमध्ये कळेलच. 

संजय गायकवाड सारखा आमदार शिवसेनेचा असूनच शकत नाही. तो एसंशि गटाचा आमदार आहे असं सांगत ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा केला होता. त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे ते वाटच पाहत आहेत, असा संशय उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. 

...म्हणून राज आणि मी एकत्र आलो!

आम्ही दोन्ही भाऊ आलो ना एकत्र. कशासाठी आलो. आम्ही आमच्या राजकीय पोळ्या भाजत बसलो असतो. मरू दे ना. नाही. प्रबोधनकारांचे आम्ही दोन्ही नातू. माझे आजोबा आणि बाळासाहेब तसेच माझे काका श्रीकांत ठाकरे हे तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात होते. आणि आमच्या डोळ्या देखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतद्रष्टा सारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Read More