Sanjay Raut Slams Eknath Shinde MP: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींच्या घरी झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीमध्ये अपमान झाल्याचा दावा खासदार तसेच पक्ष प्रवक्ते संजय राऊत यांनी खोडून काढला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना स्क्रीनवरील प्रेझेंटेशन स्पष्ट दिसत नसल्याने पुढल्या रांगेतून आम्हीच मागील रांगेत बसायला गेलो, असं राऊत म्हणालेत. ठाकरेंवर या बैठकीमधील फोटो समोर आल्यापासून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीबरोबरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून लक्ष्य केलं जात आहे. शिंदेंच्या पक्षाने केलेल्या टीकेवरुनही राऊतांनी उत्तर देताना कठोर शब्दांमध्ये निशाणा साधल्याचं दिसून आलं.
"आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे... शिवरायांचा वारसा सांगता ना रे... खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे?" असं पोस्टच्या पहिल्या ओळीत म्हस्केंनी म्हटलं आहे. "बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?" असा खोचक सवालही म्हस्केंनी उपस्थित केला आहे.
"काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे आदित्य ठाकरे... तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे! महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे," असा खोचक टोमणा म्हस्केंनी लगावला आहे. "थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे," असं म्हणत म्हस्केंनी टीका केली आहे.
नक्की वाचा >> 'आम्ही काय बिनडोक आहोत का? तुम्हालाच लय...'; अजित पवार अचानक कोणावर आणि का चिडले?
आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे...
— Naresh Mhaske (@nareshmhaske) August 8, 2025
#शिवरायांचा वारसा सांगता ना रे...
खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन
शेवटच्या रांगेत बसलात रे????#बाळासाहेबांनी आम्हाला #आत्मसन्मान #स्वाभिमान शिकवला
अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला
तुम्ही यातलं… pic.twitter.com/9pr7sDwwqX
संजय राऊत यांना म्हस्केंनी केलेल्या या टीकेचा संदर्भ देत प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच राऊत यांनी आपल्या शर्टची बाही वर करत, "अरे त्या म्हस्केला सांग... दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का मान-अपमान?" असा खोचक सवाल उपस्थित केला. "महाराष्ट्रातून इथे येऊन मोदी आणि शहांची चाटुगिरी करता. तेव्हा तुम्हाला महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं आम्ही बघू की," असंही राऊतांनी म्हटलं.
"आदी मुक्तेशवर नावाचे शंकाराचार्य आहेत ज्यांनी एकनाथ शिदेंच्या घरी जाऊन त्यांना आशीर्वाद देत असतात. काही धार्मिक विधी करत असतात. त्यांना शंकराचार्यांना स्टेट गेस्टचा दर्जा असतो. माझ्या माहितीप्रमाणे राज्याच्या गृहमंत्रालयाने काढून घेतला. का हे या म्हस्के का फस्केने सांगावं. बहुतेक आशीर्वादाचं अजीर्ण झालं. शंकराचार्यांना आशीर्वाद महागात पडले," असं सूचक विधान राऊतांनी केलं.
1) 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना मागच्या रांगेत बसवल्याचा दावा काय आहे?
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला की, राहुल गांधी यांच्या घरी झालेल्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंना अपमानजनक वागणूक देत मागच्या रांगेत बसवले गेले. बैठकीतील फोटोंमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागच्या रांगेत दिसले, यावरून हा वाद निर्माण झाला.
2) संजय राऊत यांनी या दाव्याला काय उत्तर दिले?
संजय राऊत यांनी हा दावा खोडून काढला आणि सांगितले की, प्रेझेंटेशनच्या स्क्रीनवर नीट दिसत नसल्याने उद्धव ठाकरे आणि इतर नेते स्वतःहून पुढच्या रांगेतून मागे गेले. त्यांनी याची तुलना चित्रपटगृहात मागच्या सीटवर बसण्याशी केली, जिथे स्क्रीन जवळून पाहिल्यास त्रास होतो.
3) एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नेमकी कोणती टीका केली?
शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना म्हटले की, "शिवरायांचा वारसा सांगणारे उद्धव ठाकरे काँग्रेसच्या बैठकीत शेवटच्या रांगेत बसले." त्यांनी ठाकरेंचा आत्मसन्मान आणि स्वाभिमानावर प्रश्न उपस्थित केला आणि आदित्य ठाकरेंवरही टीका करत महाराष्ट्राची दिल्लीत लाज घालवल्याचा आरोप केला. त्यांनी ठाकरेंना स्वाभिमान दाखवण्याचे आव्हान दिले.