Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

अब्दुल गद्दार, गटार... वादग्रस्त वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत पलटवार

मी मुद्दाम अब्दुल गद्दार असं म्हणत आहे. सुप्रिया सुळेंवर राजकारणात शिवीगाळ कशी करु शकतात? मी असतो तर लाथ मारुन पक्षाबाहेर केले असते? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. 

अब्दुल गद्दार, गटार... वादग्रस्त वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत पलटवार

Uddhav Thackeray, बुलडाणा : शिंदे गटाचे आमदार आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriay Sule) यांच्यावर शिवराळ भाषेत टीका केली होती. सत्तार यांनी  सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी थेट जाहीर सभेतच समाचार घेतला.  अब्दुल गद्दार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले. 

मी मुद्दाम अब्दुल गद्दार असं म्हणत आहे. सुप्रिया सुळेंवर राजकारणात शिवीगाळ कशी करु शकतात? मी असतो तर लाथ मारुन पक्षाबाहेर केले असते? असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला. तसेच अब्दुल सत्तारांचा उद्धव ठाकरेंकडून गटार असादेखील  उल्लेख करण्यात आला. 

काय म्हणाले होते अब्दुल सत्तार 

संभाजीनगरमधल्या सिल्लोड इथं सत्तार यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.  सुप्रिया सुळेंनी 50 खोके मिळाले का, असा प्रश्न अब्दुल सत्तारांना केला होता. यावर सत्तारांनी तुम्हालाही द्यायचे का, असा प्रतिप्रश्न केला होता. सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर देत तुमच्याकडे असल्यानेच तुम्ही ऑफर करत असल्याची टीका केली होती. यावर बोलताना सत्तार यांची जीभ घसरली. सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करत 'इतकी भिकारxx झाली असेल तर तिलाही देऊ' असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. जे आम्हाला खोके बोलतात त्यांच्या डोक्यात खोके भरले असल्याची टीकाही सत्तार यांनी केली आहे. 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील टीकास्त्र 

अब्दुल सत्तार यांच्यासह उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर देखील टीकास्त्र सोडले.  महापुरुषांचा, महिलांचा अपमान तरीही तुम्ही शेपट्या घालून कसं बसता? छत्रपती शिवजी महाराजांची तलवार आणणार अशी घोषणा करतात आणि दुसरीकडे राज्यपाल अपमान करतात. दिल्लीकरांना काय वाटतं महाराष्ट्रातील मर्दानगी संपली काय? वेळ पडली तर महाराष्ट्र बंद करावा लागेल असा इशारा देखील उद्धव ठाकरेंनी दिला. 

Read More