Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'उद्धव ठाकरे विराट कोहलीचं रेकॉर्ड तोडणार'

उद्धव ठाकरे हे लवकरच विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडतील.

'उद्धव ठाकरे विराट कोहलीचं रेकॉर्ड तोडणार'

नांदेड : उद्धव ठाकरे हे लवकरच विराट कोहलीचा रेकॉर्ड तोडतील. उद्धव ठाकरेंनी आत्तापर्यंत २३५ वेळा सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त नांदेडमध्ये जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेमध्ये विखे पाटील बोलत होते. यावेळी रामदास कदम यांच्यावरी विखे पाटील यांनी निशाणा साधला. सरकारविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू असं रामदास कदम म्हणतात पण हेच कदम मुख्यमंत्र्यांचे बूट धरतात, असं टीकास्त्र विखे पाटील यांनी सोडलं.

या जनसंघर्ष यात्रेदरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासकीय अधिकाऱ्यांनाही इशारा दिला. अनेक अधिकारी आपल्याकडे लक्ष ठेवा असं आम्हाला सांगतात. उद्या आमची सत्ता येणार आहे. जे अधिकारी आमच्या विरोधात वागतायत त्यांनी विचार करावा, असं विखे पाटील म्हणाले. 

 

Read More