Ujjwal Nikam Answers On Did Ajmal Kasab Demand Mutton Biryani In Jail : दहशतवादी अजमल कसाबला जेलमध्ये बिर्याणी दिल्याचा दावा नेहमीच केला जातो. कसाबला जेलमध्ये मटण बिर्याणी दिल्याच्या दाव्याबाबत उज्वल निकम यांचा आजपर्यंतचा मोठा खुलासा केला आहे. झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत उज्ज्वल निकम यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी कसाबला खरचं जेलमध्ये बिर्णी दिली का याबाबत स्पष्टपमे खुलासा केला आहे.
दहशतवादी अजमल कसाबनं जेलमध्ये मटण बिर्याणी मागितली यावरुन राजकीय पक्षांनी फेक नरेटिव्ह सेट केला यात माझी काय चूक असा सवाल उज्वल निकम यांनी उपस्थित केला. तसेच कसाबला बिर्याणी दिल्याची चर्चा नेमकी कशी सुरु झाली याबाबत देखील खुलासा केला. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत उज्वल निकमांनी कसाबच्या बिर्याणीचा किस्सा आणि त्यावरुन निर्माण झालेल्या वादावर भाष्य केलं. कसाबनं बिर्याणी मागितली असं आपण कधीच म्हटलं नाही पण पुढं तत्कालिन सरकार दहशतवाद्यांना जेलमध्ये बिर्याणी खाऊ घालतं असा प्रचार करण्यात आला. या सगळ्यात आपला कोणताही दोष नव्हता असंही निकम यांनी सांगितलं. काहींनी फेक नरेटिव्ह सेट केला तुम्ही त्यांना प्रश्न विचारा असंही त्यांनी सांगितलं.
26/11च्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी अजमल कसाब हा उज्वल निकमांना बादशहा या आदरार्थी विशेषणानं हाक मारत होता असा गौप्यस्फोट उज्वल निकमांनी केलाय. टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत उज्वल निकमांनी आरोपींसोबत होत असलेल्या संवादाबाबत माहिती दिली. खटल्याच्या निमित्तानं आरोपींशी नेहमी संवाद होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
अजमल कसाब हा आपल्याला बादशहा नावानं हाक मारत होता. पाकिस्तानातल्या पंजाब आणि पेशावर प्रांतात सन्माननीय व्यक्तीला बादशहा नावानं हाक मारतात त्यामुळं अजमल कसाब निकमांनाही त्याच विशेषणानं बोलावत असल्याचं त्यांनी सांगितलं. एका आरोपीवर जन्मठेपेचा खटला चालवत होतो त्या आरोपीनं आपल्या आजारपणाची पत्र लिहून चौकशी केल्याचीही आठवण त्यांनी सांगितलं.
2014मधील पुण्यातील मोहसीन शेख झुंडबळी प्रकरणात मुस्लीम खासदार आणि एका पत्रकाराच्या आक्षेपामुळं माघार घेतल्याची माहिती उज्ज्वल निकम यांनी दिलीय. टू द पॉईंट मुलाखतीत त्यांनी माघारीवर भाष्य केलं. उज्ज्वल निकम यांना खटला देण्यात आला होता. पण एका मुस्लीम खासदारानं सरकारला पत्र लिहून उज्ज्वल निकम यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सत्कार स्वीकारलाय. त्यामुळं त्यांना खटला देऊ नये अशी भूमिका घेतली. त्या पत्रामुळं आपण माघार घेतल्याचा दावा निकमांनी केलाय.