Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

नरेंद्र दाभोलकर हत्या : आरोपींना जामीन मिळाल्याने उज्ज्वल निकम यांनी फटकारले

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयीत आरोपींना जामीन मिळाल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तपास यंत्रणेला फटकारले आहे. 

नरेंद्र दाभोलकर हत्या : आरोपींना जामीन मिळाल्याने उज्ज्वल निकम यांनी फटकारले

रत्नागिरी : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयीत आरोपींना जामीन मिळाल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तपास यंत्रणेला फटकारले आहे. तपास यंत्रणेनी याचा गंभीरपणे विचार करावा, असा सल्ला दिलाय.

पुणे न्यायालयाने नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या तीन संशयीतांना जामीन मंजूर केला. अमोल काळे, राजेश बंगेरा आणि अमित दिगवेकर यांच्या विरोधात सीबीआयने ९० दिवसांत आरोपत्र दाखल केले नसल्याने या तिघांना पुणे न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.

हा जामीन मंजूर का केला याची तीन कारणे उज्ज्वल निकम यांनी सष्ट केली. अशा प्रकराच्या हत्येतून कटातून निर्माण होत असतात. अशासाठी तपास यंत्रणेला वेळ लागतो. पण अशा घटनांमध्ये तपासयंत्रणेनी वेळेत दोषारोप पत्र दाखल करणे आवश्यक आहे, असे मत उज्ज्वल निकम यांनी व्यक्त केले.

Read More