Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

उद्धव ठाकरेंच्या खासदाराला अमित शाहांचा फोन; ठाकरेंना ना फोन, ना शुभेच्छा, राजकीय खेळी की आणखी काय?

Nagesh Patil Ashtikar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेना UBT हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना फोन केला होता. फोनवर त्यांनी आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रविवारी आष्टीकरांचा वाढदिवस होता त्याचं औचित्य साधत शाहांनी त्यांचं अभिष्टचिंतन केलंय.

उद्धव ठाकरेंच्या खासदाराला अमित शाहांचा फोन; ठाकरेंना ना फोन, ना शुभेच्छा, राजकीय खेळी की आणखी काय?

Nagesh Patil Ashtikar: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी ठाकरेंचे खासदार नागेश आष्टीकरांना फोन केला होता. फोनवर शाहांनी आष्टीकरांना शुभेच्छा दिल्या.अमित शाहांच्या फोनची हिंगोलीत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा फक्त शुभेच्छांचा फोन होता की ठाकरेंचे खासदार गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा सुरू झालीय..

उद्धव ठाकरे यांचाही रविवारी 65 वा वाढदिवस होता, पण अमित शाह यांच्याकडून त्यांना कुठलाही फोन आला नव्हता किंवा सोशल मीडियावर साधी पोस्टही नव्हती. दुसरीकडे मात्र हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना अमित शाह यांनी आवर्जून फोन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे भाजपचा ठाकरेंच्या खासदारांवर डोळा आहे का अशी चर्चा रंगलीय. दरम्यान यावर शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांनी एकदम सावध प्रतिक्रिया दिलीय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांच्या फोनमागे कुठलेही राजकारण नसल्याचं सांगितलंय, मी पण काल उद्धव ठाकरे यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या. यात राजकारणाचा काही संबंध नाही, असं त्यांनी सांगितलं आहे. 

फक्त शुभेच्छा की राजकीय खेळी?

शिवसेना-भाजप 25 वर्षांची युती तुटल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड दुरावा निर्माण झाला. यानंतर उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरील 'त्या' गुप्त बैठकीचा दाखला देत अमित शाहांना वेळोवेळी टार्गेट केलं. यामुळे अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये टोकाची कटुता आल्याचं समजतंय. नंतरच्या काळात शाहांनीच उद्धव ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी एकनाथ शिंदेंचं बंड घडवून आणल्याची चर्चा आहे. अशातच आता अमित शाहांनी आष्टीकरांना केलेला फोन हा नवा राजकीय डाव असल्याचं बोललं जातंय. 

Read More