Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'डोक्यावर संविधान घेऊन...', पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षल घुसलेयत, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप!

Urban Naxal in Pandharpur Wari: पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्यासंदर्भातील प्रश्न आमदार मनिषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये उपस्थित केला. 

'डोक्यावर संविधान घेऊन...', पंढरपूरच्या वारीत अर्बन नक्षल घुसलेयत, शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप!

Urban Naxal in Pandharpur Wari: महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. लाखो वारकरी टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि 'जय हरी विठ्ठल'च्या जयघोषात श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत आहेत. ही परंपरा 800 वर्षांहून अधिक काळापासून अव्याहतपणे सुरू असून, यंदा 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशीला हा सोहळा पंढरपुरात संपन्न होणार आहे. दरम्यान पंढरपूरच्या वारीबद्दल खळबळजनक गौप्यस्फोट सरकारकडून करण्यात आलाय. 

वारीमध्ये अर्बन नक्षल

पंढरपूरच्या वारीमध्ये अर्बन नक्षल घुसल्यासंदर्भातील प्रश्न आमदार मनिषा कायंदे यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये उपस्थित केला.  पवित्र वारीमध्ये काही लोकं अशे घुसलेयत जे देवाला मानत नाहीत, धर्माला मानत नाहीत. ते वारीबद्दल अपप्रचार करत आहेत. वारीमध्ये विठ्ठलाचे भक्त मोठ्या संख्येने जातात. वारीत कोणी कोणाला निमंत्रण दिलेलं नसतं. वेगवेगळ्या बोगस नावाखाली काही संघटना संविधान दिंडी, पर्यावरण दिंडी, लोकायत नावाने आहेत. या संघटना वारीत पथनाट्य करतात. एक दिवस तरी वारी अनुभवा असे म्हणतात. ही लोकं हिंदु धर्मीय नाहीत.त्याच्या पेहरावावरुन कळेल. हडपसर, दिवेघाट मार्गाने ही मंडळी सासवड येथे पोहोचतात. त्यांच्या वारीचा रुट आहे. ते क्यूआर कोड दिलाय. जो ब्लॅक लिस्टेड आहेत. हा हिंदू धर्माला बदनाम करण्याचा कट आहे. पंढरपूरच्या वारीचा अशाप्रकारे गैरफायदा घेत असल्याचा आरोप मनिषा कायंदेंनी केलाय. 

डोक्यावर संविधानाचे पुस्तक 

अनेक माता भगिनी डोक्यावर तुळीशीची रोप घेऊन अनेक किलोमीटर चालतात. पण काहीजण डोक्यावर संविधानाचे पुस्तक घेताना ही मंडळी दिसतात. संविधानाच्या माध्यमातून सभागृह चालू आहे. काही वारकरी संघटना याविरोधात मुख्यमंत्र्यांना भेटल्या. यावर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. जे लोक जामिनावर आहेत ते पण या वारीत घुसलेयत. काही लोकं गोंदीया, चंद्रपुरचे आहेत. धर्म, वारीला बदनाम करायचे काम सुरु आहे. आमचा यावर आक्षेप आहे. मुख्यमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेतल्याची माहितीदेखील मनिषा कायंदे यांनी दिली. 

संविधानाच्या नावाखाली फेक नेरेटीव्ह

6 तारखेला आषाढी एकादशी आहे. या वारीचा कोणी गैरफायदा घेऊ नये. अशी लोकं असतील तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई झाली पाहिजे. मागच्या एप्रिलमध्ये संविधानाच्या नावाखाली फेक नेरेटीव्ह पसरवलं तीच ही लोकं नाहीत ना? असा प्रश्न मनिषा कायंदे यांनी विचारला. यात किती लोकं आहेत हे पोलीस तपासतील, असेही आमदार मनिषा कायंदे पुढे म्हणाल्या.

Read More