Uttan-Virar Sea Link Phase-1: उत्तन ते विरारदरम्यान सागरी सेतू उभारण्यास राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास (एमएमआरडीए) ला मंजुरी देण्यात आली आहे. उत्तर ते विरार या कॉरिडोरमुळं मुंबईतील वाहतुकीचा ताण हलका होणार असून मुंबईतून विरारला पोहोचणे सोप्पे होणार आहे. त्याचबरोबर, सरकार विरार ते पालघर दरम्यानचा टप्पा-2चा देखील अभ्यास करण्यात येत आहे. हा सी-लिंक 8 मार्गिकेचा असणार आहे.
या नव्या सी-लिंकमुळं उत्तर ते दक्षिण प्रवास करणे सोप्पं होणार आहे. एकूण आठ लेनचा महामार्ग असून भविष्यात थेट दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडला जाणार आहे. नियंत्रित महामार्ग (Access Control) म्हणून हा कॉरिडॉर कार्यरत असेल आणि शहरांतर्गत प्रवास सुलभ होईल. त्याचबरोबर या महामार्गामुळं पश्चिम द्रूतगती महामार्ग, एस. व्ही. रोड आणि लिंक रोडसारख्या प्रमुख मार्गांवरील ताण कमी होऊन यूव्हीएसएलमुळे वाहतुकीची कोंडी दूर होईल. यामुळे प्रवासाचा कालावधी कमी होईल, रस्ते अपघात कमी होतील आणि ध्वनी व वायुप्रदूषणात लक्षणीय घट होईल.
वर्सोवा ते उत्तन हा भाग मुंबई महापालिकेच्या उत्तर सागरी किनारा मार्ग प्रकल्पात असल्यामुळे तो सध्याच्या संरेखनातून वगळण्यात आला आहे. उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची उभारणी 'एमएमआरडीए'मार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे उत्तर मुंबई महानगर क्षेत्राचा विकास होणार आहे. 28 मार्च 2025 रोजीच्या बैठकीत सुधारित टप्पा -१ प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पामुळं मुंबईतून विरारला पोहोचणे अवघ्या 45 मिनिटांत शक्य होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित सुरुवातीला वर्सोवा-विरार सागरी सेतू म्हणून प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली. ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या बैठकीत हा प्रकल्प 'एमएमआरडीए'कडे देण्यात आला. फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन टप्प्यांमध्ये प्रकल्प विभागण्यात आला.
यूव्हीएसएल टप्पा-१ची एकूण लांबी (सागरी सेतू आणि जोडरस्त्यांसह) 55.12 किमी असून यात खालील जोडरस्त्याचा समावेश आहे :
•उत्तन ते विरार सागरी सेतू : २४.३५ किमी
•उत्तन जोडरस्ता : ९.३२ किमी
•वसई जोडरस्ता : २.५ किमी
•विरार जोडरस्ता : १८.९५ किमी