Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वैभव नाईकांना टक्कर देण्यासाठी नारायण राणे पुन्हा एकदा मैदानात?

नारायण राणे हे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत... राज्यसभेचे खासदार आहेत

वैभव नाईकांना टक्कर देण्यासाठी नारायण राणे पुन्हा एकदा मैदानात?

सिंधुदुर्ग : कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे जायंट किलर ठरलेले वैभव नाईक यांच्याविरोधात पुन्हा एकदा नारायण राणे निवडणूक लढविण्याची शक्यता वाढली आहे. नारायण राणे हे सध्या भाजपचे सहयोगी सदस्य आहेत. राज्यसभेचे खासदार आहेत. त्यामुळे राणे काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 

राजकीय वर्तुळात याबाबत उत्सुकता असताना नितेश राणेंनी कुडाळ - मालवणमधून नारायण राणेच निवडणूक लढवतील असा संकेत दिलेत.

नितेश राणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी खासगीत बोलताना असे संकेत दिले आहेत. त्यामुळे कुडाळ - मालवण विधानसभा मतदार संघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून कोण निवडणूक लढविणार? या राजकीय चर्चेला तूर्तास तरी पूर्णविराम मिळाला आहे.

Read More