Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

पिंपरी-चिंचवड-महाबळेश्वर-व्हाया कोकण नेपाळ, असा झाला नीलेश चव्हाण फरार, झी 24 तासच्या हाती मोठी माहिती

वैष्णवी हगवणे प्रकरणातील चर्चेत फरार आरोपी निलेश चव्हाणच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. 

पिंपरी-चिंचवड-महाबळेश्वर-व्हाया कोकण नेपाळ, असा झाला नीलेश चव्हाण फरार, झी 24 तासच्या हाती मोठी माहिती

महाराष्ट्रात सध्या चर्चेत असलेल्या वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला अटक केल्याची बातमी समोर आली आहे. कस्पटे कुटुंबियांना धमकावल्या प्रकरणी निलेश चव्हाणला बेड्या घालण्यात आल्या आहेत. निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट जारी केलं होतं. २३ मे पासून निलेश चव्हाण फरार आहे. करीश्मा आणि लता हगवणे यांचे फोन घेऊन निलेश चव्हाण फरार झाल्याच सांगण्यात येत आहे. त्यामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे निलेशकडे असल्याच पोलीस सांगत आहेत. निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरुन पकडण्यात आलं आहे. पण या निलेश चव्हाणचा पिंपरी चिंचवड ते नेपाळ प्रवास कसा होता याची माहिती झी २४ तासच्या हाती मोठी माहिती मिळाली आहे. 

निलेश चव्हाणचा नेपाळपर्यंतचा प्रवास 

झी २४ तासला मिळालेल्या माहितीनुसार, वैष्णवी प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाण हा २३ मे पासून फरार आहे. निलेश चव्हाण हा पिंपरी चिंचवडमधून महाबळेश्वरला गेला. त्याने तिथे काही काळ वास्तव्य केलं. त्यानंतर तो थेट कोकणात पोहोचला. कोकणात त्याच्या फोनचं लास्ट लोकेशन पोलिसांना दाखवण्यात आलं. यानंतर पोलिसांनी त्याची कोणतीच माहिती मिळत नव्हतं. वैष्णवी प्रकरणातील या फरार आरोपी निलेश चव्हाणकडे महत्त्वाचे पुरावे असल्याचा संशय देखील पोलिसांनी वर्तवला होता. या दरम्यान बावधन पोलिसांनी निलेश चव्हाणच्या नेपाळ बॉर्डरवरुन मुसक्या आवळल्या आहेत. निलेश चव्हाणला थेट नेपाळ बॉर्डरवरुन अटक करण्यात आली आहे. नेपाळ बॉर्डरपर्यंत निलेश चव्हाण कसा पोहोचला हा सवाल विचारला जात आहे. 

त्यानंतर निलेश चव्हाण पुन्हा मुंबईत आला. मुंबईहून त्याने दिल्ली असा प्रवास केला. हा प्रवास ट्रेनने केल्याच सांगण्यात येत आहे. दिल्लीवरुन रोड प्रवास करत त्याने सोनौली या नेपाळ सिमेवरील गावात मुक्काम केला. यानंतर त्याला आता नेपाळ बॉर्डरजवळ अटक करण्यात आल्याच सांगण्यात येत आहे. 

निलेश चव्हाणवरील आरोप 

निलेश चव्हाणवर अनेक आरोप असल्याच सांगण्यात येत आहे. पण पोलिसांनी वैष्णवी हगवणे प्रकरणात कस्पटे कुटुंबाला धमकावल्याच्या मुख्य आरोपाखाली त्याला अटक केली आहे. एवढेच नव्हे तर करीश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचा फोनही निलेश चव्हाणकडे असल्याच सांगण्यात येत आहे. तसेच वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं नऊ महिन्याच बाळ देखील निलेश चव्हाणकडेच होतं. निलेश चव्हाण आणि हगवणे कुटुंबाचा संबंध काय?असा सवाल देखील विचारला जात आहे. 

Read More