Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

मोठी बातमी! वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद करिश्माची सुटका होणार? जामीनाचा मार्ग मोकळा, कारण...

Vaishnavi Hagawane News Today: हगवणे कुटुंबाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर आता जामीनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला. जामीन अर्जासाठी उद्या सुनावणी होण्याची शक्यता.  

मोठी बातमी! वैष्णवीचा नवरा, सासू आणि नणंद करिश्माची सुटका होणार? जामीनाचा मार्ग मोकळा, कारण...

Vaishnavi Hagawane News Today: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपींच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणावर सध्या न्यायालयात सुनावणी सुरू आहे. 28 मे रोजी हगवणे कुटुंबातील पाच जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. तर, वैष्णवीचा पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनवाण्यात आली होती. मात्र ही पोलिस कोठडी 29 मे रोजी संपल्याने त्यांना पुन्हा पिंपरी चिंचवड न्यायालयात हजर करण्यात आले. या तिघांना न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

न्यायालयात 28 मे रोजी झालेल्या युक्तीवादानंतर शशांक, लता आणि करिष्मा हगवणे यांच्या पोलिस कोठडीत एक दिवस तर राजेंद्र आणि सुशील यांच्या पोलिस कोठडीत 31 मेपर्यंत वाढ केली होती. त्यानंतर 29 मे रोजी शशाक, लता आणि करिष्मा यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळं आता तिघांनाही जामिनासाठी अर्ज करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

न्यायालयीन कोठडी मिळताच वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिश्मा हगवणे यांनी जामीनासाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. या जामिन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. तर शनिवारी वैष्णवीचा दीर आणि सासरा यांची पोलिस कोठडी संपणार आहे. 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात न्यायालयात झालेल्या युक्तीवादाची चांगलीच चर्चा राज्यभरात होत आहे. आरोपींच्या वकिलांनी केलेल्या युक्तीवादानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरत आहे. तसंच, हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचादेखील प्रयत्न केला आहे. वैष्णवीची टेंडंसी सुसाईड करण्याची होती. तीचे एका व्यक्तीसोबतचे चॅट वाचले गेले होते. त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केलाय. एकदा रॅट पॉयझन खाऊन आणि एकदा गाडीतुन उडी मारून, असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता. तसंच, एखाद्या नवऱ्याने आपल्या बायकोला चार कानाखाली मारल्या म्हणजे हॅरेसमेंट ठरत नाही, असा युक्तीवादही आरोपींकडून करण्यात आला. 

हगवणे बंधूंचा पाय आणखी खोलात

पिस्तुल परवाने मिळवण्यासाठी चक्क खोटे पत्ते दाखवले असल्याचा आरोप शशांक आणि सुशील हगवणे यांच्या विरोधात करण्यात आला आहे. शशांक आणि सुशील हगवणे विरोधात पुणे पोलिसात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शशांक वारजेतील तर सुशीलने कोथरूड भागातील बोगस घरभाडे करार दाखवून  पिस्तुल परवाने मिळवले आहेत. सध्या दोन्ही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखलची प्रक्रिया सुरू आहे. 

Read More