चंद्रकांत फुंदे, झी मीडिया पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबाची रोज नव नवी माहिती समोर येतीये. आता तर घोड्यावर रपेट मारतानाचा हगवणेचा व्हिडिओ समोर आलाय. हुंड्याच्या पैशांवर हगवणेंचा हा माज पाहून आता चीड व्यक्त होतीये. राजेंद्र हगवणे आणि त्याची मुलं शशांक आणि सुशील हगवणे यांचं खिशात नाही आणा आणि यांना बाजीराव म्हणा अशी अवस्था होती की काय असा प्रश्न निर्माण झालेत. हगवणे कुटुंबीयांना सगळे उंची शौक होते.राजेंद्र हगवणे अरबी घोड्यावर घोडेस्वारी करतानाचा व्हिडिओ समोर आलाय. राजेंद्र हगवणेनं केलेली घोडेस्वारी मिरवण्यासाठी पोरांनी रिल्स बनवले. हगवणे कुटुंबाचा बैलगाडा आहे. हगवणे कुटुंबानं गौतमीची लावणीही केली. पण ते शौक पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडं पैसा नव्हता. कारण वैष्णवीच्या शाही विवाहात कस्पटे कुटुंबाकडून हुंड्यात फॉर्च्युनर गाडी आणि 51 तोळे सोनं लाटल्यावरच त्यांनी शर्यतीच्या बैलासमोर गौतमी पाटीलला नाचवलं होतं. पण तेच माजोरडे हगवणे बाप लेक आपल्या दोन्ही सुनांना जनावरांपेक्षाही बेहत्तर वागणूक देत होते हे आता लपूल राहिलेलं नाही.
अर्थात हा सगळा माज तो राजकीय पाठबळावरच करत होते हे देखील काही आता लपून राहिलेलं नाही. म्हणूनच गौतमीच्या बैलासमोरील डान्सच्या माजाबद्दल पुण्यातील पञकाराने अजितदादांना छेडलं असता त्यांनी पञकारांनाच हे असं गप्प केलं. तर मंडळी सांगायचा मुद्दा हाच की, प्रत्येकवेळी राजकीय पाठबळ मिळत गेल्याने हे हगवणे कुटुंबं हा असा जाहिरपणे माज दाखवत गेलं.
खरंतर राजेंद हगवणे यांचे वडील तुकाराम हगवणे याचं नाव मुळशीत अतिशय आदराने घेतलं जायचं. पण त्यांच्या पुढच्या पिढीने फुकाचा माज दाखवून आपल्याच घराण्याचं नाव हे असं मातीमोल केलंय. सुनांच्या घरुन आणलेल्या पैशांवर फुकटा माज करणा-यांची खेटरानं पूजा करावी अशी संतप्त प्रतिक्रिया आता समाजातून उमटतेय.
सिनेदिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मध्यंतरी 'मुळशी पँटर्न' हा सिनेमा काढून गुंठेवारीतून निर्माण झालेल्या लँड माफियांच्या गुन्हेगारीवर प्रकाश टाकला होता. पण आता त्याच मुळशीतल्या हगवणे कुटुंबाने आपल्याच सुनेचा हुंडाबळी घेऊन सामान्य मुळशीकरांना पुन्हा एकदा नाहक बदनाम केलंय...असं च इथं खेदानॆ नमूद करावं लागेल.