Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार असणारे राजेंद्र हगवणे कोण आहेत? अजित पवारांशी काय कनेक्शन?

Vaishnavi Hagavane Murder Case: राजेंद्र हगवणे कोण आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

वैष्णवीच्या आत्महत्येनंतर फरार असणारे राजेंद्र हगवणे कोण आहेत? अजित पवारांशी काय कनेक्शन?

Vaishnavi Hagavane Murder Case: पुण्यात राजकीय नेत्याच्या सुनेनं आत्महत्या केलीय. राष्ट्रवादीचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या सुनेनं आत्महत्या केलीय. वैष्णवी हगवणे असं मृत सुनेचं नाव आहे  मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. काय आहे हे प्रकरण? यात नाव घेतलं जाणारे राजेंद्र हगवणे कोण आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

वैष्णवीचा हुंड्यासाठी छळ?

आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी पती शशांक, सासू आणि नणंदेला अटक केलीय. तर राजेंद्र हगवणे आणि दुसरा मुलगा फरार आहे.

कोण आहेत राजेंद्र हगवणे?

राजेंद्र हगवणे हे अजित पवार गटाचे पुण्यातील मुळशी तालुकाध्यक्ष आहेत, त्यामुळंच सून वैष्णवी हगवणे मृत्यूप्रकरणी त्यांना अटक होत नाही. या चर्चेत तथ्य नाही, पोलिसांची तीन पथकं त्यांच्या शोधात असल्याचा दावा बावधन पोलिसांनी केलाय. मात्र वैष्णवीची हत्या नसून ती आत्महत्या असल्याचा दावा पोलिसांनी केलाय. 

राजेंद्र हगवणेंवर गुन्हा दाखल 

आत्महत्येपूर्वी तिचा हुंड्यासाठी छळ केल्याचा, तिला मारहाण केल्याचं, शरीरावर मारहाणीचे व्रण असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. त्यामुळं सुनेला आत्महत्येस प्रवृत्त आणि हुंडाबळी केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आणि सासरे राजेंद्र हगवणेंसह सासू, पती शशांक, नणंद आणि दिरेवर गुन्हा दाखल आहे. पैकी पती शशांक, सासू आणि नंदेला अटक करण्यात आलीये तर सासरे राजेंद्र आणि दिराचा शोध सुरुये.

Read More