Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

वैष्णवी हगवणे प्रकरणाला वेगळं वळण? साडी अन् रुममधील पंखा उलगडणार हत्येचं गूढ?

Vaishnavi Hagawane Death Case Updates: या प्रकरणाला दोन आठवड्यांहून अधिक कालावधी उलटल्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणाला वेगळं वळण? साडी अन् रुममधील पंखा उलगडणार हत्येचं गूढ?

Vaishnavi Hagawane Death Case Latest News: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या पुण्यामधील मुळशी येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचं गूढ उलगडण्यासाठी आता पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वैष्णवीने 16 मे रोजी आत्महत्या केल्यानंतर या प्रकरणातील नवे धक्कादायक खुलासे समोर आले. वैष्णवीचा हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून छळ केला जात असल्याचं उघड झालं. त्यामधूनच वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या पालकांनी केली. या प्रकरणामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडलेल्या असतानाच सध्या एकीकडे पोलीस तपास सुरु असतानाच या प्रकरणाची सुनावणी न्यायालयामध्ये सुरु आहे. अशातच आता वैष्णवीच्या मृत्यूचं गूढ तिच्या घरातील दोन वस्तूच उलगडणार असल्याची दाट शक्यता आहे. 

गूढ उलगडणार

पोलीस वैष्णवीच्या आत्महत्येसंदर्भातील तपासादरम्यान आता तिच्या रुममधील दोन गोष्टींची फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणी करणार आहे. या दोन गोष्टींच्या सहाय्याने वैष्णवीने स्वत:ला संपवलं. वैष्णवी तिच्या रुममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र तिच्या पालकांनी तिची ही आत्महत्या नसून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. वैष्णवीच्या शरीरावरील जखमांवरुनही हगवणे कुटुंबाने तिचा छळ केला, मारहाणीत तिचा मृत्यू झाला का अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. मात्र आता वैष्णवी ज्या साडीला लटकलेल्या अवस्थेत सापडली तीच साडी प्रकरणाचं गूढ उलगडण्यासाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

नेमकं काय करणार फॉरेन्सिक लॅबमध्ये?

वैष्णवीने ज्या पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली त्या पंख्याची तसेच साडीची न्यायवैद्यक प्रयोगशाळेत म्हणजेच फॉरेन्सिक लॅबमध्ये चाचणी होणार आहे. वैष्णवीचं वजन 71 किलो होतं. त्यामुळेच 71 किलो वजन पंख्याला पेलेलं जाऊ शकते का याची तपासणी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामधूनच वैष्णवीच्या आत्महत्येसंदर्भातील इतर शंकांना पूर्ण विराम मिळू शकतो किंवा नवीन काही माहिती समोर येऊ शकते अशी दाट शक्यता आहे.

नक्की वाचा >> बाईचा नाद भोवला... 'तिच्या'सोबत असताना केलेल्या 'त्या' एका चुकीमुळे पोलिसांना सापडला निलेश चव्हाण

हागवणेंना आज कोर्टात हजर करणार

कस्पटे कुटुंबियांना बंदुकीच्या जोरावर धमकावणाऱ्या आणि बाळाची हेळसांड केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या निलेश चव्हाण याची पोलिस कोठडी आज संपत आहे. तर दुसरीकडे वैष्णवी हुंडाबळी प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांची ही पोलिस कोठडी आज संपत आहे. आज दुपारच्या सुमाराला पोलिस त्यांना न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत येणाऱ्या चाकणजवळील महाळुंगे पोलिस स्थानकात वैष्णवीचा पती शशांक हागवणे आणि सासू लता हगवणे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या संबंधी त्यांना महाळुंगे पोलिसांकडून अटक केली जाण्याची शक्यता आहे.

Read More