Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Vaishnavi Hagwane Case: काँग्रेस आमदाराच्या पुत्राला अटक; पण त्याचा प्रकरणाशी संबंध काय?

Vaishnavi Hagwane Suicide Case Update: 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर आठ दिवस राजेंद्र हगवणे आणि त्यांचा थोरला मुलगा बेपत्ता होता.

Vaishnavi Hagwane Case: काँग्रेस आमदाराच्या पुत्राला अटक; पण त्याचा प्रकरणाशी संबंध काय?

Vaishnavi Hagwane Case Update: संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱ्या वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणामध्ये पिंपरी-चिंचवडमधील बावधन पोलीसांनी एका आमदार पुत्राला अटक केली आहे. या आमदारपुत्राने आठ दिवस फारर राहिलेल्या वैष्णवी हगवणेचा छळ करणारा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना लपण्यासाठी आश्रय दिला होता. बावधन पोलिसांनी एकूण पाच जणांना अटक केली आहे.  

चार ठिकाणी करण्यात आली कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरार राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे आठ दिवस लपून बसले होते. पुण्याबरोबरच ते सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी वास्तव्यास होते अशी माहिती समोर आली आहे. आरोपींना आश्रय दिल्याप्रकरणी एकूण पाच जणांना ताब्यात घेतलं असून आज त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. लोणावळा, मावळ, साताऱ्याबरोबरच थेट कर्नाटकमधूनही पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे.

कोणाकोणाला अटक करण्यात आली?

पोलिसांनी हगवणे पिता-पुत्राला मदत केल्याप्रकरणी अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे:

1) मोहन उर्फ ​​बंडू उत्तम भेगडे, वय 60, वडगाव-मावळ.

2) बंडू लक्ष्मण फटक (वय 55) लोणावळा.

नक्की वाचा >> Vaishnavi Hagwane Case: पत्नीचे S*x व्हिडीओ शूट करायचा निलेश चव्हाण; बेडरुमच्या फॅनमध्ये...

3) अमोल विजय जाधव (वय 35) पुसेगाव, खटाव, सातारा.

4) राहुल दशरथ जाधव (वय 45) पुसेगाव, खटाव, सातारा.

5) प्रीतम वीरकुमार पाटील (वय 47) कोगनोली, (तहसील चिकोडी) बेळगाम, कर्नाटक.

आमदाराचा मुलगा कोण?

या प्रकरणात अटक करण्यात आलेला प्रीतम वीरकुमार पाटील हा काँग्रेस आमदार वीरकुमार पाटील पुत्र आहे. गेल्या कार्यकाळापर्यंत काँग्रसचे आमदार होते. 28 वर्षे काँग्रेसचे आमदार राहिलेले वीरकुमार पाटील हे ऊर्जामंत्री देखील होते. 

हगवणे पिता-पुत्राने आठ दिवस नेमकं काय केलं?

- 17 मे 2025 रोजी एन्डीव्हर कारने राजेंद्र आणि सुशील हगवणे औंध रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी आले होते. या प्रकरणामध्ये आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता लक्षात येताच राजेंद्र हगवणे थोरल्या पुत्राबरोबर रुग्णालयामधूनच पसार झाला. हगवणे पिता-पुत्राने पोलिसांना चकवा देण्यासाठी आपली कार बदलली. दोघेही थार कारने 'मुहूर्त लॉन्स' येथे पोहचले. त्यानंतर दोघेही पवना येथून पावना धरण परिसरात बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी थांबले.

नक्की वाचा >> ...तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता! 'मुलीच्या छातीला सासऱ्याने...', 'त्या' पत्रातून खुलासा

> 18 मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे थार गाडीने आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्कामी होते.

> 19 मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनीही परत कार बदलली. दोघेही बालेरो कारने पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात पळून गेले.

> 19 आणि 20 मेदरम्यानची रात्र राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांनी सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्ये मुक्काम केला.

> 20 मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे पुसे गावातून पसरणीमार्गे कोगनळी येथील 'हॉटेल हेरिटेज'मध्ये मुक्कामासाठी पोहोचले. 

> 21 मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही प्रीतम पाटील यांच्या शेतावर मुक्कामी होते. 

> 22 मे रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पिता-पुत्र पुण्यामध्ये दाखल झाले. दोघांनीही तीन सहकाऱ्यांसोबत एका हॉटेलमध्ये जेवण केल्याचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलं आहे.

> 23 मे रोजी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनाही बावधन पोलिसांच्या तुकडीने स्वारगेट परिसरातून अटक केली. 

Read More