Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी...'; नव्या कोऱ्या Fortuner च्या काचांवर लिहिलेली कविता चर्चेत

Vaishnavi Hagwane Suicide Case Fortuner Car: वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे फॉर्च्यूनर कारची चांगली चर्चा दिसून येत आहे.

'हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी...'; नव्या कोऱ्या Fortuner च्या काचांवर लिहिलेली कविता चर्चेत

- सचिन कसबे

Vaishnavi Hagwane Suicide Case Fortuner Car: फॉर्च्यूनर कार ही भारतातील मोजक्या लक्झरी कार्सपैकी एक आहे. ही कार आजकाल राजकारणी आणि प्रतिष्ठित लोकांची ओळख बनली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील हगवणे कुटुंबाने लग्नाच्या हुंड्यात फॉर्च्यूनर घेतल्याची माहिती समोर आली. कस्पटे कुटुंबाकडून हुंडा म्हणून लग्नात फॉर्च्यूनर घेतल्याचं समोर आल्यानंतर सून वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर ही फॉर्च्यूनरही जप्त करण्यात आली आहे. मात्र हवगणे प्रकरणामुळे आजकाल या महागड्या कारच्या मालकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला असल्याची भावना काही लोकामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे करमाळा मधील एका पठ्ठ्याने फॉर्च्यूनरवर लिहिलेला मजकूर सध्या चर्चेत आला आहे.

नव्या फॉर्च्यूनरवरच लिहून घेतलं वाक्य

करमाळा तालुक्यातील अतुल खुपसे यांनी नुकतीच नवीन फॉर्च्यूनर कार खरेदी केली आहे. पण फॉर्च्यूनरमधून उतरल्यानंतर लोकांना संशय येतोय की एवढी महागडी गाडी हुंड्यात तर घेतली नाही ना? लोकांना समजावे म्हणून खुपसे यांनी फॉर्च्यूनरच्या मागच्या बाजूला कारवर एक मजकूरच लिहून घेतला आहे. सध्या या मजकुराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

काय लिहिलंय काचेवर?

"तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी! मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा, अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय पण हगवणेमुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धु धु धुतलंय," असा मजकूर कारच्या मागील बाजूला लिहिलं आहे.

अनेकजण हसतात

अतुल खुपसे यांच्या नव्या कारवरील हे वाक्य वाचल्यानंतर लोक हसतात. अनेकजण याची चर्चाही करतात. फॉर्च्यूनर सध्या प्रेस्टीज सिम्बॉल म्हणून काही जण वापरत आहेत. पण आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू नये म्हणून खुपसे यांनी लिहिलेल्या संदेशाची चर्चा सध्या पंचक्रोषीत सुरू आहे.

fallbacks

अनेकजण खाजिल झालेत

हगवणे यांनी हुंड्यात फॉर्च्यूनर घेतली होती. सध्या ती वापरणारे काहीजण खाजिल होत असल्याचं अतुल खुपसे यांनी आपल्या कारवर लिहून घेतलेल्या या मजकुरातून स्पष्ट होतंय.

Read More