Vaishnavi Hagwane Suicide Case Shocking Details: वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणामध्ये वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना गुरुवारी रात्री उशीरा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. याच प्रकरणामध्ये वैष्णवीच्या मुलाला वैष्णवीच्या आई-वडिलांकडे सोपवण्यास नकार देणाऱ्या निलेश चव्हाणविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या वैष्णवीच्या घरच्यांना बंदुकीचा धाक दाखवणाऱ्या निलेश चव्हाणचा धक्कादायक गुन्हेगारी इतिहास समोर आला आहे.
सून वैष्णवीवर अत्याचार केल्याने हगवणे कुटुंबातील पाच सदस्य पोलिसांच्या ताब्यात असून यावरुन संताप व्यक्त केला जात असतानाच हगवणेंचा निकटवर्तीय असलेल्या निलेश चव्हाणाचा इतिहासही कौटुंबिक हिंसाचाराने बरबटलेला आहे. निलेशने स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्वतःच्या पत्नीचे आक्षेपार्ह व्हिडीओ रेकॉर्ड केले होते. या प्रकरणी निलेश चव्हाणवर 2019 साली पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना पिस्तुलाच्या साहाय्याने धमकावल्याचा गुन्हा निलेश चव्हाणवर दाखल झाला आहे.
निलेश चव्हाणबद्दलची कोणती माहिती समोर आली आहे हे पाहूयात...
- 3 जून 2018 ला निलेश चव्हाणच लग्न झालं.
- जानेवारी 2019 मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला बेडरूम मधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद गोष्ट अडकवल्यासारखं वाटलं. तिने निलेशला याबद्दल विचारलं असता त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली .
- पुढच्या फेब्रुवारी महिन्यात निलेशच्या पत्नीला घरातील एअर कंडिशनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला. त्यावेळीही निलेशने उडवाउडवीची उत्तर दिली.
- एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप उघडून पहिला असता त्यामध्ये त्यांच्या शरीरसंबंधांचे व्हिडीओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं.
- बेडरूममधील लाईट सुरु ठेऊन निलेश पत्नीला शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडत होता.
- निलेशच्या लॅपटॉपमध्ये निलेशच्या बायकोला त्याचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ देखील आढळून आले .
- निलेशच्या पत्नीने याबात जाब विचारला असता त्यानं घरातील चाकू दाखवत तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला. त्याचबरोबर बळजबरीने तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले.
- निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई - वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली असता त्यांच्याकडून तिचाच छळ सुरु करण्यात आला.
- त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश पत्नीचा छळ करत राहिला.
- अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला. तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022 ला गुन्हा दाखल झाला .
- निलेशच्या अटकपूर्व जमीनअर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर देखील वारजे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. अखेर मुंबई उच्च न्यालयाने त्याला अटकपूर्व जमीन दिला.
- निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय आहे आणि पोकलेन मशीनचा देखील तो व्यवसाय करतो.
- निलेश चव्हाण हा शशांक हगवणेची बहिण करिश्मा हगवणेचा मित्र म्हणून ओळखला जातो. शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामधे तो अनेकदा सहभागी असायचा.
- कर्वेनगर भागातील औदूंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडीलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत.