Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आत्महत्येआधी वैष्णवीच्या शरीरावर...; हगवणेंच्या क्रूरपणाचा कळस; Post Mortem मधून खुलासा

Vaishnavi Hagwane Post Mortem Report: या प्रकरणामध्ये पोलिसांनी हगवणे कुटुंबातील पाच जणांना अटक केली असून कोर्टात पोलिसांनी या संदर्भातील धक्कादायक माहिती दिली आहे.

आत्महत्येआधी वैष्णवीच्या शरीरावर...; हगवणेंच्या क्रूरपणाचा कळस; Post Mortem मधून खुलासा

Vaishnavi Hagwane Post Mortem Report: मुळशीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामधील आरोपी पती, सासू आणि नणंदेच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आता हे तिघेही 28 मेपर्यंत पोलीस कोठडीमध्येच राहणार आहेत. वैष्णवीचा सासरा राजेंद्र तुकाराम हगवणे, सासू लता राजेंद्र हगवणे दिर सुशील राजेंद्र हगवणे, नणंद करीश्मा राजेंद्र आणि पती शशांक हगवणे हे पाचजण सध्या अटकेत आहेत. यापैकी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघेही आठ दिवस फरार होते. त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालामध्ये म्हणजेच पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून काही धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. 

नेमकं काय आहे वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालात

शवविच्छेदन अहवालात समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारेच पोलिसांनी सासू, पती आणि नणंदेची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी न्यायालयासमोर युक्तीवाद करताना शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक तपशील कथन केला. वैष्णवीच्या शरीरावर मारहाणी झाल्याच्या एकूण 30 खुणा पोस्टमॉर्टमदरम्यान आढळून आल्या. वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी 15 जखमा या तिने आत्महत्या करण्यापूर्वीच्या 24 तासांच्या आतील असल्याचं पोस्टमॉर्टम अहवालात म्हटलं असल्याचं पोलिसांनी न्यायालयात बाजू मांडताना स्पष्ट केलं.

वैष्णवीच्या अंगावरील जखमांबद्दल धक्कादायक खुलासा

वैष्णवीच्या अंगावरील जखमांपैकी एक जखम तिच्या मृत्यूच्या सहा दिवस आधीच झाली होती असं अहवालामध्ये म्हटलं आहे. वैष्णवीच्या शरीरावरील 11 जखमा या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या आहेत. या जखमांपैकी दोन जखमा या तीन ते सहा दिवसांपूर्वीच्या असल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळेच सखोल चौकशीसाठी आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी पोलिसांनी केली.

नक्की वाचा >> Vaishnavi Hagwane Case: काँग्रेस आमदाराच्या पुत्राला अटक; पण त्याचा प्रकरणाशी संबंध काय?

पोलीस या प्रश्नांची उत्तर शोधतायेत

वैष्णवीला मृत्यूच्या 24 तास आधी कधी आणि कुठे मारहाण करण्यात आली होती? कोणी ही मारहाण केली होती? नेमकं काय घडलं होतं? यासंदर्भातील तपास पोलिसांकडून केला जणार असल्याची माहिती मिळत आहे. न्यायालयाने पोलिसांची माहिती मान्य करत आरोपींच्या पोलीस कोठडीमध्ये दोन दिवसांनी वाढ केली आहे.

वैष्णवीचा मृतदेह पाहिला अन् फरार झाले

16 मे रोजी वैष्णवीने स्वत:ला संपवल्यानंतर 17 मे 2025 रोजी एन्डीव्हर कारने राजेंद्र आणि सुशील हगवणे औंध रुग्णालयात वैष्णवीचा मृतदेह पाहण्यासाठी आले होते. या प्रकरणामध्ये आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता लक्षात येताच राजेंद्र हगवणे थोरल्या पुत्राबरोबर रुग्णालयामधूनच पसार झाला. हगवणे पिता-पुत्राने पोलिसांना चकवा देण्यासाठी आपली कार बदलली.

नक्की वाचा >> ...तर वैष्णवी हगवणेचा जीव वाचला असता! 'मुलीच्या छातीला सासऱ्याने...', 'त्या' पत्रातून खुलासा

दोघेही थार कारने 'मुहूर्त लॉन्स' येथे पोहचले. त्यानंतर दोघेही पवना येथून पावना धरण परिसरात बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर मुक्कामी थांबले. त्यानंतर हे दोघे आठ दिवस फरार होते. अखेर या दोघांना बावधन पोलिसांनी पुण्यातून अटक केली. 

Read More